Devendra Fadnavis , नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाला, असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरुन त्या वक्तव्यावरुन निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


काँग्रेस कमिटीच्या सचिवांकडून निवडणूक आयोगात तक्रार दाखल 


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संदेश सिंगलकर यांनी ॲड.असीम सरोदे यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाला तक्रार आणि कायदेशीर नोटीस पाठविली आहे. यामध्ये वोट जिहाद या शब्दाचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वापर केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.


देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले होते?


देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद करण्यात आला. धुळे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच मतदारसंघात आपला उमेदवार आघाडीवर होता. मात्र, केवळ मालेगाव मध्ये मतदारसंघात 1 लाख 94 हजार मतांनी आपला उमेदवार मागे जातो. आणि चार हजार मतांनी पराभूत होतो.  निवडणुकीत हार जीत महत्वाची नाही, कधी आपला पक्ष जिंकेल, तर कधी तो पक्ष जिंकेल. मात्र, संघटीत मतदान करुन हिंदुत्ववादी पक्षाला पराभूत करु शकतो, असा काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला असून 48 पैकी 14 मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. 


लोकसभा निवडणुकीत महायुतीचा महाराष्ट्रात दारुण पराभव 


लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला होता. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 31 जागा महाविकास आघाडी आणि त्यांच्या विचारांच्या उमेदवारी जिंकल्या होत्या. तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपच्या फायरब्रँड नेत्यांना पराभवाची धूळ चारली होती. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, प्रतापराव चिखलीकर, सुजय विखे, कपिल पाटील, सुभाष भामरे , भारती पवार यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


शांत झोप लागावी म्हणून भाजपात गेले होते, महाविकास आघाडीतही शांत झोप लागेल याची खात्री देतो, राऊतांकडून हर्षवर्धन पाटलांची फिरकी


Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचा 'तो' जुना व्हिडिओ अमोल मिटकरीनी बाहेर काढला; 'सहजच' विचारला खोचक सवाल!