Sanjay Raut on Harshvardhan Patil, मुंबई : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.4) शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीत येत आहेत, त्यांना इथेही शांत झोप लागेल", असं म्हणत संजय राऊतांनी हर्षवर्धन पाटलांची फिरकी घेतली आहे.
हर्षवर्धन पाटील आल्याने महाविकास आघाडीचे हात बळकट
संजय राऊत म्हणाले, हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतील विषय आहे. हर्षवर्धन पाटील हे जेव्हा भाजपात गेले तेव्हा आम्हा सगळ्यांना धक्का बसला होता. मात्र त्यांना शांतच झोप लागावी म्हणून ते तिकडे गेले. इडी ,सीबीआय यांचा कोणताही त्रास होणार नाही म्हणून ते भाजपात गेले होता. कदाचित त्यांना तिथे झोप लागली नसावी. मात्र ते आता महाविकास आघाडी येत आहेत. आम्ही त्यांना खात्री देतो की, या ठिकाणी त्यांना शांत झोप लागेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी ते येत आहेत.
आमदारांना मंत्रालयामध्ये वरतून उड्या मारण्याची वेळ आली
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, विधानसभेची मुदत संपत आली असून राज्यातील मिंदे सरकार या सगळ्यांच्या पाठिंब्यावर टिकून आहे. मात्र या सरकारमध्ये किती अस्वस्थता आहे, हे परत एकदा दिसले आहे. मराठा समाज असेल धनगर समाज असेल यांना यांना एकमेकांच्या विरोधात झुंजत ठेवण्याचं काम या सरकारने केला आहे. शेवटी आज या आमदारांना मंत्रालयामध्ये वरतून उड्या मारण्याची वेळ आली. सुदैवाने या ठिकाणी जाळ्या लावल्या आहेत ती जाळी पाहूनच त्यांनी उड्या मारल्या असतील. मात्र या आमदारांनी ज्या उड्या पक्षांतर करून मारल्या आहेत. त्या अधिक धोकादायक आहेत त्यांनी ह्या अशा उड्या मारल्यामुळेच आज मंत्रालयात उड्या मारण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी नक्कीच आपापल्या समाजाची फसवणूक केली आहे. एक घटना बाह्य सरकार या आमदारांमुळेच महाराष्ट्रात आले या सरकारला कोणतीही दिशा नाही.
सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर याबाबत संजयराव त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून अशा पद्धतीच्या चारिटेबल ट्रस्ट या कोणाच्या आहेत क्रांतिकारकांच्या नावाने सुरू करण्यात आलेले आहेत? याचे सूत्रधार कोण आहे हे पहावे लागेल? क्रांतीकारकांच्या नावाने ट्रस्ट सुरू करून त्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या