Himachal Upchunaav natije: हिमाचल प्रदेश पोटनिवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मंडी लोकसभा मतदारसंघाव्यतिरिक्त, विधानसभा पोटनिवडणुकीत फतेहपूर, अर्की आणि जुब्बल-कोटखाई विधानसभा जागांवर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या तीनही जागा काँग्रेसने काबीज केल्या आहेत. राज्यात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत पोटनिवडणुकीचा हा निकाल भाजपसाठी धक्का मानला जात आहे. त्याचवेळी राज्यात काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता बळावली आहे.






फतेहपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार भवानी सिंह यांनी भाजपच्या बलदेव ठाकूर यांचा 5789 मतांनी पराभव केला. दुसरीकडे, अर्की विधानसभा जागेवर काँग्रेसचे उमेदवार संजय अवस्थी यांनी भाजपचे उमेदवार रतन सिंह पाल यांचा 3443 मतांनी पराभव केला. जुब्बल-कोटखई विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आपला झेंडा फडकवला. येथे काँग्रेसच्या रोहित कुमार यांनी अपक्ष उमेदवार चेतन सिंह यांचा 6293 मतांनी पराभव केला. मंडी लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीबद्दल बोलायचे तर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी भाजपचे उमेदवार ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांचा 8,766 मतांनी पराभव केला.


विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ही जागा 4 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जिंकली होती. 2014 मध्येही भाजपने ही जागा जिंकली होती. अशा स्थितीत यावेळीही भाजप या जागेवर विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही.


महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच लोकसभेला शिवसेनेचा खासदार विजयी


दादरा नगर हवेलीच्या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकलाय. कलाबेन डेलकर 60 हजाराच्या फरकानं निवडून आल्या आहेत. महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच लोकसभेला शिवसेनेचा खासदार निवडून आलाय.