नागपूरः माझ्या उमेदवारीसंदर्भात मी तिन्ही गांधींसोबत (INC) बोललो आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची (congress president election) निवडणूक निष्पक्षपणे व्हावी ही गांधी परिवाराचीही इच्छा आहे. या निवडणुकीत तेसुद्धा निष्पक्ष राहणार आहेत. यानिमित्ताने एक चांगली निवडणूक व्हावी, जेणेकरून कॉंग्रेस पक्ष मजबूत झाला पाहिजे आणि हे स्वतः आमच्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणत आहेत. त्यामुळे ही निवडणूक लढण्यावरून माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचे उमेदवार खासदार शशी थरूर म्हणाले. 


अध्यक्षपदाची निवडणूक युद्ध नाही


नागपुरातील दिक्षाभूमीवर (Deekshabhoomi) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर थरूर (Shashi Tharoor) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कॉंग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Dr.Ashish Deshmukh) त्यांच्यासोबत होते. कॉंग्रेसने जवळपास 51 वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीचा उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने दिला. याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, ही निवडणूक म्हणजे आमच्या सहकाऱ्यांमध्ये होत असलेली प्रक्रिया आहे. हे काही युद्ध नाही, यामध्ये कुणी शत्रू नाही. जनतेला आम्ही आमचे संकल्प सांगून जनतेचे समर्थन मिळविण्याचा आम्हा सर्वांचाच प्रयत्न आहे. शेवटी लोकांना माहिती आहे, की संकटांपासून मी कधी दूर गेलो नाही, तर त्याचा सामना केला आहे. 


जिंकण्याचा विश्वास नसता तर...


12 प्रदेशांतील (12 states) अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितले की, तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवा. कारण त्यांना पक्षामध्ये बदल हवा आहे. त्यांचा आवाज, युवक कॉंग्रेसचाही (Youth Congress) आवाज बनण्याचा माझा प्रयत्न आहे. या निवडणुकीत 9,150 इतके मतदान आहे. 17 ऑक्टोबरला (Voting) मतदान होणार आहे आणि जास्तीत जास्त मते मिळतील, असा विश्‍वास असल्याचे थरूर यांनी सांगितले. जर निवडून येण्याचा विश्‍वास नसता, तर आज मी येथे उभा नसतो, असेही ते म्हणाले. 


सामान्य कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद


 थरूर म्हणाले, मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)आत्मविश्‍वास आहे, ही चांगली गोष्ट आहे. माझ्या बाबतीत मीसुद्धा आश्‍वस्त आहे. कारण पक्षामध्ये माझं ऐकणारे भरपूर लोक आहेत. खरगे यांच्यासोबत पक्षाचे सर्व मोठे नेते आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला विजयाचा विश्‍वास आहे का, असे विचारले असता, माझ्या समर्थनार्थ 12 पेक्षा जास्त प्रदेशांतील सामान्य कार्यकर्ते आले होते. तेच खरी पक्षाची ताकद आहेत. पक्षातले केंद्रीकरण थांबवायचे आहे आणि जिल्हा आणि तालुका स्तरावरील सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना जास्त वाव देण्याचा प्रयत्न माझा असणार आहे, असे शशी थरूर म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Congress President Election : नव्या अध्यक्षांना काम करण्याची मोकळीक मिळाली नाही तर आवाज उठवत राहू; पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा


मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक; राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा