Assembly Election Result: उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाचही राज्यांच्या विधानसभांचे निकाल (Assembly Election Result) आता समोर आले आहेत. या पाच राज्यांपैकी चार राज्यांत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर, या निवडणुकीत काँग्रेस अपयशी ठरलं आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. तसेच आम्हाला आत्मचिंतानाची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. 


इतर राज्यातील निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही
पाच राज्यातील निवणुकींच्या निकालानंतर नाना पटोले म्हणाले की, " पंजाबमध्ये अवास्तव घोषणा आप ने केल्या, जेजाहिरनाम्यात सांगितलंय ते पूर्ण होणार का यावर आमचं लक्ष असेल.गोव्यात मागे जो डाका पडला होता तो पडू नये याची काळजी घेणं आमचं काम होतं ते आम्ही केलं. महाराष्ट्रातल्या राजकारणावर या निकालाचा काहीही परिणाम होणार नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीबाबत आता फार वेळ घालवू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. 


फडणवीसांची विरोधकांवर टीका
उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालंय. मनोहर पर्रिकरांशिवाय होणारी ही गोवा विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे गोव्यात सत्ता राखण्याचं आव्हान आणखी कठीण होतं. पण भाजप श्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी दिली आणि त्यांनी हा विश्वास सार्थ ठरवल्याचे चित्र सध्या सध्या दिसत आहे. पाचही राज्यांचे निवडणुकांचे निकाल पाहता कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे. तर शिवसेनेची लढाई भाजपशी नाही, 'नोटा' सोबत असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha