UP Election Result : उत्तर प्रदेशातील आग्रा हा भाजपचा गड आहे हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झालं आहे. आग्रामध्ये नऊच्या नऊ जागांवर विजय मिळवत भाजपने सलग दुसऱ्यांदा क्लीन स्वीप दिला आहे. आग्रा ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बेबी राणी मौर्य यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर आग्रा बाह्य मतदारसंघातून राणी पक्षालिका सिंह यांनी विजय मिळवला आहे.
उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. आतापर्यंत भाजप 265 ठिकाणी आघाडीवर तर समाजवादी पक्षाला 133 जागांवर समाधान मानावं लागलंय. बसपा तिसऱ्या स्थानी तर काँग्रेस चौथ्या स्थानी पोहोचलं आहे. गेल्या वेळच्या तुलनेत या वेळी भाजपच्या जागा जरी घटल्या असल्या तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली आहे. त्यामुळे आता योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या सत्तेची कमान सांभाळणार आहेत हे स्पष्ट झालंय.
आग्रातील विजयी उमेदवार
- फतेहाबाद- छोटे लाल वर्मा
- खैरागढ़- भगवान सिंह कुशवाहा
- फतेहपुर सीक्री- बाबूलाल चौधरी
- आग्रा आऊटर- राणी पक्षालिका सिंह
- आग्रा ग्रामीण- बेबीरानी मौर्य
- आग्रा छावनी- जीएस धर्मेश
- आग्रा दक्षिण- योंगेंद्र शर्मा
- आग्रा उत्तर - पुरुषोत्तम खंडेलवाल
- एत्मादपूर - डॉ.धर्मपाल सिंह
संबंधित बातम्या:
- Election 2022 : भाजपचं घवघवीत यश, पाच पैकी चार राज्यात भाजपला एकहाती सत्ता, पंजाबमध्ये आपला कौल
- Punjab Election Result 2022 : 'पॅड वूमन' जीवनज्योत कौर ठरल्या 'जायंट किलर'; नवज्योतसिंह सिद्धू आणि विक्रम माजिठिया यांना चारली धूळ
- UP Election Result : भाजपमधून सपमध्ये गेलेले स्वामी प्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का, सुरेंद्र कुमार कुशवाहा यांनी केला पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha