मुंबई : "पहिले महागाई डायन होती आता डार्लिंग झाली आहे. हे जुमलेबाज सरकार आहे. राजस्थानमध्ये निवडणुकीत 450 रुपयाला गॅस देणार होते पण अद्याप मिळत नाही. आज गॅसवर 100 रुपय कमी केले. निवडणूक झाली की हे 250 रुपयाने वाढवणार", अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे. लोंढे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले, आज मोदी यांनी 100 रुपये कमी करून खोटा जुमला खेळलाय. हे जुमलेाबाजी करणारे सरकार आहे. आमचं सरकार महागाईपासून सुटका करत होते. मोदी सरकार आले त्यांनी सबसिडी बंद केली. मोदीवरील जाहिरात सरकारच्या पैशांतून खर्च होते. आमच्या काळात गॅस विरोधात स्मृती इराणी आंदोलन करत होत्या. आता त्या कुठे आहेत? मोदी सरकार हे जनतेसोबत खोटे बोलत होते, असेही अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी नमूद केले.
भाजपकडून दबावतंत्राचा वापर
अतुल लोंढे (Atul Londhe) पुढे बोलताना म्हणाले, मला पुरंदरच्या तहाची एक गोष्ट आठवते. राजा मानसिंग औरंगजेबाचा सेनापती म्हणून येथे आले. त्यांनी 32 किल्ले शिवाजी महाराजांचे घेतले. संभाजी महाराज त्यांच्याकडे ओलीस ठेवण्यात आले होते. संभाजीराजांना ते म्हणाले की हे 32 किल्ले आता आमचे झाले आहेत. तेव्हा संभाजी महाराज म्हणाले, तुम्हाला हत्ते मिळाले ते तुम्ही चालत आणि डुलत घेऊन जाल. मात्र, किल्ले कसे घेऊन जाणार आहेत. साखर कारखाना तुम्ही जप्त केला. तो घेऊन जाऊ शकणार नाहीत. तुमच्याकडे काही पुरावे नव्हते. हे भाजपचे दबावतंत्र आहे, असं अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला
आम्ही प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला. त्यांना प्रत्येक बैठकीला बोलावलं आहे. असेही यावेळी अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या यावरुन महाविकास आघाडीमध्ये दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रकाश आंबेडकरांना 5 ते 6 जागा देण्यास तयार आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांनी वंचितला केवळ 3 जागा द्याव्यात, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या