Sanjay Shirsat : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असे त्यांनी म्हटले. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. 


संजय शिरसाट म्हणाले की,  अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता तर नक्कीच ठरला होता. मात्र पहिले 105 ज्यांचे आहेत त्यांचा सन्मान होता. शेवटच्या दिवशी मातोश्रीवर भाजपची ऑफर आली होती. पण बोलणीच केली नाही. उद्धव ठाकरेंना शिंदे विचारायला गेले तेव्हा मी बोलणी करणार नाही, तुम्हाला करायची तर करा, असे त्यांनी म्हटले. कारण पवारांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने उद्धव ठाकरेंची मती फिरली,  असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे. 


महाविकास आघाडीत ताळमेळ आहे का?


संजय शिरसाट म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. युती होणार नाही होणार, किती जागा मिळणार? भाजप घटक पक्षांना बुडवणार या वल्गना केल्या जात आहेत. काही जण दिलेल्या शब्दाची वारंवार गोष्टी करत आहेत. मात्र माध्यमातून येणारी माहिती चुकीचे आहे. योग्य तो सन्मान आमचा ठेवला जाणार हे ठरलेलं आहे. महाविकास आघाडीत ताळमेळ आहे का? वंचित कुठे? काँग्रेस कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 


जागावाटपाबाबत संभ्रम दूर होईल


जागा वाटपाचा आकडा ठरलेला नाही.भाजप जास्त जागा मागत आहे. आमचे 13 खासदार आहेत. मात्र आम्ही 18 जागा मागत आहोत. कोणत्या जागा सोडायच्या हे तीन नेते ठरवतील.  तीनही नेत्यांनी प्रत्येक मतदार संघाच सर्व्हे केलेला आहे. मागणी विविध प्रकार नेते करत असतात. मात्र आग्रह कोणाचा मान्य होईल हे आताच सांगता येणार नाही. सोमवारी हा संभ्रम दूर होईल. 


संजय राऊतांना प्रत्युत्तर 


संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरुन केलेल्या टीकेलाही शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर टीका करण्याचा जो प्रयत्न केलाय त्याने समजून घेतलं पाहिजे की, सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले नाहीत किंवा स्टे आणला नाही. नार्वेकरांनी दरवेळेस त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, राऊतांना जाणीव होती की आपण चुकीची घटना सादर केली आहे, असा त्यांनी केला आहे. 


आणखी वाचा 


उद्धवजी आप को आना होगा, अमित शाहांनी केलेल्या फोनचा किस्सा, उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत सांगितला!