Nilesh Lanke : पारनेरचे राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे निलेश लंके हे शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. 
 
निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Election) निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते निवडणुकीची तयारी करताना दिसून येत आहेत. महायुतीत अहमदनगरची जागा भाजपला सुटली. भाजपकडून सुजय विखे पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे निलेश लंके नाराज असल्याचे बोलले जात आहे. 


निलेश लंकेंची महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी


आता निलेश लंके यांनी अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवन येथे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महत्वाच्या  बैठकीला हजेरी लावल्यानेते राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे , माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची उपस्थिती होती. 


निलेश लंकेंना मविआकडून उमेदवारी ?


मागील काही दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा आहे, मात्र याबाबत निलेश लंके ठामपणे भूमिका मांडताना दिसत नव्हते. आज निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मविआची जी बैठक झाली. त्या बैठकीला निलेश लंके यांनी हजेरी लावल्याने त्यांची भूमिका स्पष्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश कधी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप अहमदनगरसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगरचे उमेदवार असणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


निलेश लंकेंच्या पत्नीचे सूचक वक्तव्य


अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, मला लोकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लोक म्हणताय की, तुमच्या दोघांपैकी एक जण निवडणूक लढा. त्यामुळे आम्ही देखील उत्साही आहोत. आमचा निर्णय लवकरच जाहीर होईल. याबाबत वरिष्ठांशी बोलणे सुरु आहे. 'आगे आगे देखो होता है क्या' असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Shrikant Shinde : 'सुजयच्या नावातच जय, त्यामुळे सुजयचा विजय निश्चित', श्रीकांत शिंदेंचे अहमदनगरमधून वक्तव्य