मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्व पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. असं असलं तरी जागावाटपाचा तिढा (Mahayuti Seat Sharing) अद्याप कायम आहे. महायुतीतील जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. जागावाटपाबाबत अद्याप महायुतीत खलबतं सुरु असल्याचं दिसून येत आहे. जागावाटपासाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी गेल्या काही दिवसात दिल्लीवारी केल्याचंही दिसून येत आहे. आता मु्ख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला जाणार
जागावाटपाच्या संदर्भातील चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री 8 वाजता दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेच्या जागांच्या अनुषंगाने आज अंतिम चर्चा पार पडणार असल्याची माहिती आहे. दिल्लीतील आजच्या बैठकीनंतर महायुतीचे उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुतीच्या जागापाटपाचा तिढा सुटणार?
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना जागावाटपाबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, आमचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे, 20 टक्के काम लवकरच पूर्ण करु. बैठकीमध्ये याचा निर्णय होईल. तीन पक्षांचं अंतिम जागावाटप बाकी आहे. कोल्हापूर छत्रपती सन्मान, मग साताऱ्यातील उदयनराजे उमेदवारी दिली तर, तीही बिनविरोध होणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. उदयनराजे भोसले यांची अमित शाहांसोबत आज भेट होईल, ते त्यांचं मत मांडतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची आज किंवा उद्या बैठक होईल.
मनसे-भाजप युती होणार?
मनोज जरांगे पाटील यांच्या वाहत्या गंगेत अनेक जण हात धुऊन घेत आहेत. मराठा आंदोलनाचे खटले मागे घेण्यात येतील, मात्र जिथे पोलिसांवर हल्ला झाला, ते खटले मागे घेता येणार नाहीत. कोणाचा पक्ष कोणाकडे जात नाही, मी राज ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा प्रवक्ता नाही, ते महायुतीकडे येण्याची चर्चा सुरू आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, 'मी उद्धव ठाकरे यांना टोमणे बहाद्दर ही उपमा दिली आहे ती उपमा साध्य करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत, एक वाक्य विकासावर बोला, फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना टोला, 25 वर्षात त्यांनी मुंबईत एकही प्रोजेक्ट आणला नाही, मनोरंजन करणे आणि हेडलाईन मिळवणे या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नाही', असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :