मुंबई : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, मात्र महायुतीतील (Mahayuti Seat Sharing) जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. जागावाटपावरून मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये मध्यरात्री खलबतं सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यरात्रीपर्यंत बैठक सुरु होती. महायुतीमध्ये अद्याप काही मतदारसंघाबाबत जागावाटपाचा तिढा कायम आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे.


मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये मध्यरात्री खलबतं


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर अडीच तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचाच उमेदवार मैदानात उतरणार असल्याची माहिती देखील सुत्रांकडून समोर येत आहे.


वर्षा बंगल्यावर मध्यरात्री बैठक


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यात वर्षा बंगल्यावर अडीच तास चर्चा झाली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या जागेवर उदय सामंत आपल्या भावासाठी आग्रही आहेत. शिवसेनेला ही जागा सोडल्यास मोठ्या ताकदीने ही जागा निवडून आणू असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केल्याचं समजतंय.तर पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजतंय.


छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचाच उमेदवार - सूत्र


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. छत्रपती संभाजीनगरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठा नेते आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील इच्छुक आहेत. पण भाजप सुद्धा या जागेसाठी आग्रही असल्याचं सूत्रांकडून समजतंय. तर या जागेसाठी भाजपचाच उमेदवार मैदानात उतरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार, कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?