एक्स्प्लोर

...तर भोंदू अशोक खरातला ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार नेमला असता; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं

Devendra Fadnavis: ⁠भोंदूबाबा खरात संदर्भात निवेदन केलं आहे, तसेच याप्रकरणी ज्यांच्याकडे माहिती आली असेल त्याची माहिती शासनाकडे द्यावी.

मुंबई : राज्य सरकारच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण केलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी 15 विभाग दिले होते. ⁠मात्र, त्यातील अनेक विषय चर्चेत आलेच नाहीत, दुसऱ्याच विषयावर बोलले, त्यांचा तो अधिकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणावर भाष्य केलं. तसेच, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची भेळमिसळ होता कामा नये, आपल्या संतांनी देखील भोंदूगिरीला स्थान दिलं नाही. मात्र, त्यांनी देवाचं अस्तित्वही नाकारलं नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भोंदूगिरीला कुठंलही स्थान नसल्याचे म्हटले. तसेच, खरातप्रकरणी कडक कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले. 

⁠भोंदूबाबा खरात संदर्भात निवेदन केलं आहे, तसेच याप्रकरणी ज्यांच्याकडे माहिती आली असेल त्याची माहिती शासनाकडे द्यावी. ⁠या प्रकरणाने आपण कुठे जातो याचा विचार करण्याची गरज आली आहे. आपण सर्वजण श्रद्धा मानणारे आहोत मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे. ⁠अंधश्रद्धा पाळली की कसा विवेक हरवतो हे उदाहरण आहे. सर्वच संतानी देवाचं अस्तित्व स्वीकारलं आहे, नाकारलं नाही मात्र त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात बोलताना म्हटले. संताची शिकवण आपल्याला महत्वाची आहे, ⁠आपला महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे मात्र भोंदूगिरीली स्थान नाही मिळालं पाहिजे. ⁠जादुटोणा संदर्भात नियम अंतिम टप्प्यात आहेत. या कायद्याची अंमलबजावणी आपण केली आहे, जादुटोणा करुन समस्या संपल्या असत्या तर डोनाल्ड ट्रम्पचा सल्लागार म्हणून त्यालाच नेमला असता, असेही मुख्यमंत्र्‍यांनी उपरोधात्मकपणे म्हटले.

हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते. युद्ध ड्रोनऐवजी लिंबू मिरचीनं लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवादाला इथं बसून टाचण्यांनी संपवून टाकलं असतं, आणि सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता पडली नसती. पाच दहा भोंदू बाबा पाठवले असते आणि आपली सीमा अगदी त्या ठिकाणी नीट झाली असती. सगळ्यात महत्त्वाचं आशिषजी, प्रचारसभा घ्याव्या लागल्या नसत्या, एका ठिकाणी बसून निवडणुका जिंकता आल्या असत्या, असे म्हणत भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेवर फडणवीसांनी जोरदार प्रहार केला. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, आपण ज्याला स्पिरिच्युएलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि ज्यात कोणाचे अहित होत नाही ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ती श्रद्धा असू शकत नाही ती अंधश्रद्धा आहे, असेही मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.  

60 दिवसांत दोषारोपपत्र दाखल होईल

संबंधित गुन्ह्यात 10 वर्षापेंक्षा कमी शिक्षा आहे, त्यामुळे 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ⁠महिलांच्या संदर्भात गुन्हे आहेत ते 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करत आहेत. ⁠वकिलांना दोनपेक्षा जास्त अॅडजोनमेंट मागता येणार नाही, अशी माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी दिली. 

हेही वाचा

जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या खूनाचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Karuna Sharma on Pankaja Munde and Dhananjay Munde: पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget