एक्स्प्लोर

ठाकरे बंधू एकत्र येणार? उद्धव ठाकरेंचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी शिवसेना-मनसे एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच, आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यानंतर मुंबईसह कोल्हापुरातील शिवसैनिक आणि मनसैनिक यांना अत्यंत आनंद झाला आहे. हे दोन्ही बंधू एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या सैनिकांची इच्छा आहे हे दोन्ही बंधू एकत्र यावेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इतर पक्षांची चांगलीच अडचण होऊ शकते. ठाकरे हा ब्रँड काय आहे, हे महाराष्ट्राला दिसून येईल अशा शब्दात शिवसैनिक आणि मनसैनिक मनातील इच्छा बोलून दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्यावर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हात जोडत, आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढू आणि जिंकू असे म्हटले. 

उद्धव ठाकरेंनी शिवसेना-मनसे एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे राज ठाकरे देतील, मी कशी प्रतिक्रिया देणारं, माझा काय संबंध येतो. यांनी साथ द्यायची आणि त्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिला, त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण, काही हरकत नाही मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला काय आहे, असं मला वाटत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो असेही फडणवीसांनी म्हटलं. 

लोकं विकास बघतात, लोकं आमच्यासोबत - लोढा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होईल, 'सब कुछ लुटा कर मिला तो क्या हुआ' अशी डायलॉगबाजी करत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीमुळे काय फरक पडणार नसल्याचे मत व्यक्त केलं. मनसे आणि शिवसेना एक होऊ द्या ना, पण लोकं विकास बघतात. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास बघतात. त्यामुळे लोक आमच्याबरोबर आहेत. भाजप हा स्वतःला राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणतो, राष्ट्राचे नियम आणि सिद्धांत आहे, त्याप्रमाणे आम्ही चालणार असे उत्तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.  

मुख्यमंत्री गडचिरोलीत, युनिटला अत्याधुनिक शस्त्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली पोलिसांच्या सी. सिक्सटी युनिटला रशियन बनावटीचे अत्याधुनिक शस्त्र देण्यात आले आहे. 172 असॉल्ट रायफल, 19 मशीन पिस्टल आणि भारतीय बनावटीच्या 300 खास बुलेटप्रूफ जॅकेट्स सी 60 च्या जवानांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अत्याधुनिक शस्त्रांमुळे गडचिरोली पोलिसांच्या सर्वात यशस्वी अशा C-60 युनिटची मार्क क्षमता आणखी वाढणार असून जंगलातील त्यांचे ऑपरेशन्स आणखी अचूक होतील, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात तेच होईल; एकनाथ शिंदेंनी हात जोडले, एकाच वाक्यात पहिली प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget