इम्तियाज जलील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा,आदर्श ठेवीदारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास...
हा इशारा देण्यापूर्वी ते पोलीस आयुक्तालयात गेले होते त्यावेळी पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळवून देऊ असं म्हणल्यावर वेळ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जलील यांनी दिला.
![इम्तियाज जलील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा,आदर्श ठेवीदारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास... Chhatrapati Sambhajinagar Imtiyaj Jaleel warning to CM Eknath Shinde on Aadarsh Scam Chhatrapati Sambhajinagar इम्तियाज जलील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा,आदर्श ठेवीदारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/01/445f4460db671df6376f2325921d40c317225166247671063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chhatrapati Sambhajinagar: आदर्श ठेवीदारांच्या प्रश्न प्रकरणी (Aadarsh Scam) मुख्यमंत्र्यांनी जर उद्या भेट दिली नाही तर त्यांचे योग्य ते स्वागत करू असा इशारा माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaj Jaleel) यांनी दिलाय. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान आदर्श ठेवीदारांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा आश्वासन दिले होते. मात्र अजूनही ठेवीदारांचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे इम्तियाज झालेली यांनी हा इशारा दिलाय.
हा इशारा देण्यापूर्वी ते पोलीस आयुक्तालयात गेले होते त्यावेळी पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळवून देऊ असं म्हणल्यावर वेळ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जलील यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये २०० कोटींचा घोटाळा
छत्रपती संभाजीनगरचा आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. या घोटाळ्यामुळे लाडगाव मधील एका ठेवीदारांने ठेवी बुडाल्याच्या भीतीने आत्महत्या केली होती. पतसंस्थांचे ठेवीदार सध्या धास्तावले असून मुख्यमंत्र्यांनी ठेविदारांच्या संदर्भात भेट न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा जलील यांनी दिला आहे. उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे येणार आहेत.
ठेवीदार लाडकी बहना कार्यक्रमात होतील सहभागी
मुख्यमंत्र्यांचा वेळ न मिळाल्यास आमचे आदर्श ठेवीदार लाडके बहना कार्यक्रमात सहभागी होतील असे जलील म्हणाले. ठेवीदारांचे पैसे न मिळाल्याने माजी खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले असून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भेट दिली नाही तर त्यांचे योग्य ते स्वागत करू असं इशारा त्यांनी दिलाय.
पतसंस्थेच्या 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि संचालक अंबादास मानकापे याला पोलिसांनी अटक केलीय.अटकपूर्व जमिनीच्या कागदावर सह्या करण्यासाठी संभाजीनगरमध्ये एका ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून मानकापेला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)