Chhagan Bhujbal, Nashik : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भुजबळांसह त्यांच्या समर्थकांना जबर धक्का बसला आहे. राज्याच्या राजकारणातील बडे नेते असणारे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज झाले असून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होताच त्यांनी नाशिकचा रस्ता धरला आहे. कुठे टायर ची जाळपोळ, कुठे रास्तारोको तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Ajit Pawar) कार्यालयासमोरच निदर्शने करण्यात येत आहेत.
नाशिक आणि येवला तालुक्यात याला सुरुवात झालीये..त्याला कारण ठरलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातील ओबीसी चेहरा असणाऱ्या छगन भुजबळ यांना मंत्री मंडळात मिळालेला डच्चू.. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता अजित पवारांच्या पक्षात असणारे छगन भुजबळ नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत, परीणामांची तमा न बाळगता कोणालाही अंगावर घेण्याची त्यांची बेधडक, आक्रमक शैली नेहमीच चर्चेत राहिली आहे. मंडल आयोगाच्या मुद्यावर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणे, बाळासाहेब ठाकरे यांचावर टीका करणे असो, शरद पवारांची साथ देत काँग्रेसला सोडचिठ्ठी देणे असो, अजित पवारांच्या बंडाला बळ देत शरद पवारांची साथ सोडणे असो, किंवा मराठा आरक्षणाचा।मुद्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना थेट अंगावर घेत ओबीसींचा आवाज तेवढ्याच तीव्रतेने मांडणे असो. प्रत्येक वेळी छगन भुजबळ चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.. छगन भुजबळ यांची हीच भूमिका त्यांच्या वाटेतील अडसर ठरली आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना विरोध करत भुजबळ यांनी स्वतःच्या उमेदवारीचा दावा केला. भुजबळ यांनी निवडणुकीतुन माघार घेतली मात्र त्यांच्या भूमिकेविषयी पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांनी अनेकवेळा संशय व्यक्त केला होता. विधानसभा निवडणुकीत ही छगन भुजबळ यांचे उपद्रव मूल्य दिसून आले, नांदगांवचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यां विरोधात पुतण्या समीर भुजबळ यांना उतरवून भुजबळ यांनी युतीत मिठाचा खडा टाकला. त्यामुळे नांदगावची निवडणूक चांगलीच चर्चेत आली. प्रशासनावर पकड आणि पक्षात दबदबा असणाऱ्या त्याच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्यानं कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत, ठीक ठिकाणी आंदोलन करत असून पक्ष नेतृत्वालाच एक प्रकारे आव्हान देत आहेत.
छगन भुजबळ यांचा राजकिय प्रवास ही चित्रपटातील भूमिकेला साजेसा चढउतारचा राहिला आहे. भुजबळ एकीकडे राजकारणाची वेगवेगळ्या शिखरं पादाक्रांत करत असतानाच तेलगी घोटाळा प्रकरणात भुजबळ यांचे नाव जोडले गेले. महाराष्ट्र सदन घोटाळा, मनी लोंद्रीगचे आरोप झाले, ईडी च्या चौकशी नंतर तुरुंगवास भोगला. मात्र यातूनही भुजबळ बाहेर पडले, पुन्हा लढले आणि थेट मंत्रीपद पटकावले.मुबंईचे महापौर शिवसेनेचे पहिले आमदार, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असे एक ना अनेक पद उपभोगणारे भुजबळ 1991 पासून जेव्हा जेव्हा सत्तेत आले. तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळात मानाच्या स्थानावर राहिले, अजित पवार यांच्या पक्षातही वयाने आणि मानाने भुजबळ कायमच पहिल्या रांगेत राहिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान नाही हे स्वतः भुजबळ यांच्याही पचनी पडलेलं नाही, त्यामुळेच मंत्रिपद का नाही हे तुम्ही अजित पवारांचा विचारा असा रोख भुजबळ यांचा दिसतोय
आजवर जेव्हा जेव्हा भुजबळ अडचणीत आलेत किंवा मोठी लढाई लढण्याची त्यांनी तयारी केली तेव्हा तेव्हा समता परिषद आणि भुजबळ समर्थक मैदानात उतरले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, एकीकडे अधिवेशन सुरू झाले आणि दुसरीकडे भुजबळ यांनी नाशिकचा रस्ता पकडला आहे. नागपूरहून भुजबळ थेट आपल्या येवला मतदार संघात जाणार आहेत तिथुन नाशिक ला पोहचतील या दरम्यानच्या काळात कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आपली आपल्या भुजातील "बळ"राष्ट्रवादी काँग्रेसचे "दादा" असणाऱ्या अजित पवारांना दाखविणार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा बंडाच्या भूमिकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांची समजूत अजित पवार काशी काढणार त्यांचे पुनर्वसन कसे करणार आणि मंत्रिपद नाकारण्याचे काय कारण सांगणार याकडे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...