Bunty Shelke and Nana Patole : काँग्रेस नेते आणि नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बंटी शेळके यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, पराभव झाल्यानंतर बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले RSS चे एजंट असल्याचं बंटी शेळके म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या बैठकीत अस्वस्थता देखील जाणवली होती. दरम्यान, आता नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर काँग्रेस पक्षाने बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
दरम्यान, बंटी शेळके यांच्या आरोपांना नाना पटोले यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. नाना पटोले म्हणाले, त्यावर मी नंतर बोलले, तो संघटनेतला विषय आहे, त्यावर औषध नंतर करू. मी लोकशाही वाचवण्यासाठी काम करत आहे, हे गांभीर्य आहे, लोकशाही वाचेल तर देश वाचेल.
बंटी शेळके काय काय म्हणाले होते?
हस्तक्षेप करून मला उमेदवारी देण्यात आली. हे नाना पटोले यांना पटले नाही. त्यामुळे आपल्या विश्वासातील काही नेते आणि कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांना त्यांना मदत पुरवली. याशिवाय, बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवर उमेदवारी विकल्याचाही आरोप केला होता.
बंटी शेळके म्हणाले, राहुल गांधी यांनी उमेदवारी दिल्याने मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो. पंजा चिन्हावर लढलो. असे असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात एकट्याच्या बळावर निवडणूक लढावी लागली. प्रचारात संघटनेची मदत झाली नाही. पटोलेंनी या मतदारसंघात प्रचारासाठी नेत्यांना पाठवले नाही. ते स्वतः ही प्रचारासाठी आले नाही. कुठलीही मदत केली नाही, अशा शब्दात बंटी शेळके यांनी नेत्यांच्या उपस्थितीत पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
बंटी शेळकेंचा विधानसभा निवडणुकीत पराभव
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती. भाजपकडून प्रवीण दटके तर काँग्रेसकडून बंटी शेळके रिंगणात होते. याशिवाय अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. मात्र, गेल्या तीन भाजपच्या प्रवीण दटके यांनी या निवडणुकीत विजय मिळवलाय. काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांचा दटकेंनी 11516 मतांनी पराभव केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या