Bihar Floor Test: भाजपचे तीन जावई, आयटी, ईडी आणि सीबीआय: तेजस्वी यादव
Bihar Floor Test News: बिहारमधील नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यावेळी विधानसभेत बोलताना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.
Bihar Floor Test News: बिहारमधील नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यावेळी विधानसभेत बोलताना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, भाजपला मंथन करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, यावेळी कोणीही रन आऊट होणार नाही आणि ही इनिंग मोठी चालणार आहे. जेडीयू आणि आरजेडी सरकारला उद्देशून ते असं म्हणाले आहेत.
'ईडी, आयटी आणि सीबीआय, भाजपचे जावई'
सीबीआयच्या छाप्याबाबत बोलताना ते म्हणाले, "जे घराबातील, ते मरतील. जे लढतील ते जिंकणार. जेव्हा भाजप एखाद्या राज्यात हरते तेव्हा ते त्यांचे तीन जावई सीबीआय, ईडी आणि आयटीला पुढे करतात. जेव्हा मी परदेशात जातो, तेव्हा बाजप माझ्याविरोधात लुकआउट नोटीस जरी करते. जेव्हा नीरव मोदीसारखे देशद्रोही पळून जातात तेव्हा ते काही करत नाही.'' याच दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या जमाईच्या वक्तव्याचा भाजपने निषेध केला आहे.
तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, तुमचा डाव सर्वांनाच माहीत आहे. तुम्हाला सगळीकडे कब्जा करायचा आहे. सद्भाव आणि बंधुता बिघडवायची आहे. मात्र आम्ही लोकशाहीला भाजपला चिरडून टाकू देणार नाही, म्हणून आम्ही एक आहोत. संपूर्ण देशातील जनतेला आशा देण्याचे काम नितीश कुमार यांनी केले आहे. बिहारने प्रगती करावी अशी आमची इच्छा आहे. आज आम्ही एकजूट असताना तुम्हा लोकांना का त्रास होत आहे? मुख्यमंत्री रात्रंदिवस काम करतात.
When BJP fears or loses in the state, it puts ahead its three 'jamai', CBI, ED and IT... When I go to foreign countries, BJP issues lookout notices against me & when fraudsters like Nirav Modi run away, they don't do anything: Bihar Dy CM Tejashwi Yadav in Legislative Assembly pic.twitter.com/7c6cGBErCR
— ANI (@ANI) August 24, 2022
जंगलराजच्या आरोपांवर काय म्हणाले तेजस्वी यादव?
जंगलराजच्या आरोपांवर तेजस्वी यादव म्हणाले की, "आम्हाला भाजपच्या लोकांकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की, त्यांच्याकडे अशी कोणती जादू आहे की ते सरकारमध्ये असताना मंगलराज असतो आणि सरकारमधून बाहेर पडताच जंगलराज येतो. जंगलराज-जंगलराज म्हणून तुम्ही बिअरला बदनाम करत आहोत. सर्वांना शिक्षण आणि सन्मान देणे हे जंगलराज आहे का? रस्ता बांधणे हे जंगलराज आहे का? महिलांना सन्माननीय वाटा देणे हे जंगलराज आहे का? कबीरापासून रविदास, नानक, गांधी, लोहिया, कर्पूरी यांनी अशा लोकराजाची कल्पना केली होती, ज्याला हे लोक जंगलराज म्हणतात. नोकऱ्या कशा दिल्या जातात हे आम्ही शिकवू."