Shantigiri Maharaj : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) आज मतदान पार पडत आहे. नाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. 


आज सकाळी  अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर (Shantigiri Maharaj) यांनी मतदानानंतर ईव्हीएमला (EVM)  हार घातला. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वरमधील  कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता. 


शांतीगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात 


त्यानंतर शांतीगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. हा सहकारी मतदान केंद्रावर शांतीगिरी महाराजांच्या चिठ्ठ्या वाटत होता. याप्रकरणी जनेश्वर महाराजांना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. म्हसरूळ पोलिसांकडून सध्या पुढील कारवाई केली जात आहे. 


काय म्हणाले शांतीगिरी महाराज? 


नाशिकसचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजाने आपल्या गळ्यातील ईव्हीएम मशीनला घातला. मात्र आम्ही सर्वात देव बघतो, ईव्हीएम मध्ये पण देव आहे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजाकरून वंदन केले हा आदर्श आचारसंहिते उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केल्याचे शांतीगिरी महाराज यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Lok Sabha Voting LIVE: महाराष्ट्रातील सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदारांनी बजावला हक्क, पालघरमध्ये सर्वाधिक 7.95 टक्के मतदान


Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ