Maharashtra Politics , Ratnagiri News : लोकसभेच्या जागा वाटपावरून (Lok Sabha Election 2024) शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपामध्ये (BJP) वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका, असा इशारा शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला आहे. 'माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा', असं म्हणत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.  


शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी 


आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरती विश्वास ठेवून भाजपासोबत आला आहोत. त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका. याची समज त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना द्यावी असं, सांगत माझंही नाव रामदास कदम आहे लक्षात ठेवा, असा सज्जड इशाराच त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


'मोदी, शाहांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान उपटावे'


रामदास कदम पुढे म्हणाले की, 'माझी प्रामाणिक इच्छा आहे की, मोदी, शाहांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. आपला पक्ष प्रत्येकाला वाढवायचाच आहे. पण तुमच्यावरती विश्वास  ठेवून जे लोक आलेत, त्यांच केसाने गळा कापून नको. भविष्यासाठी भाजपकडून वेगळा मेसेज जात आहे, याचा भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे.'


'पुन्हा-पुन्हा आमचा विश्वासाघात झाला तर...'


मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं माहित नाही, पण पुन्हा-पुन्हा आमचा विश्वासाघात झाला तर, माझं नाव पण रामदार कदम आहे, हे मी आज सांगतोय, अशा कडक शब्दात रामदास कदमांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


शिंदे-पवारांना किती जागा मिळणार?


दरम्यान, महायुतीत जागावाटपावरून खलबतं सुरु आहेत. भाजपचं लक्ष मुंबईतील सहा मतदारसंघावर असल्याची सुत्रांची माहिती आहे. शिंदे-पवारांना फक्त जिंकणाऱ्या जागा देऊन इतर मतदारसंघ भाजप घेणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील सहापैकी पाच जागांवर भाजप लढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यावर शिंदे-पवारांसोबत भाजपचं एकमत होणार का आणि शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.



महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी! मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर..., शिंदे गटाचा भाजपला इशारा