एक्स्प्लोर

तळकोकणातील वेंगुर्ला नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा; नारायण राणेंचा महाविकास आघाडीला धोबीपछाड

तळकोकणातील वेंगुर्ला नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा रोवला गेलाय. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं आहे. भाजपच्या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल आंगचेकर यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगरसेवक विधाता सावंत यांचा 10 विरुद्ध 7 अशा मताने पराभव केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपरिषदेवर नारायण राणे यांनी आपला भाजपचा झेंडा रोवत विरोधकांना धूळ चारली आहे. काँग्रेसचे नगरसेवक विधाता सावंत यांना पक्षाने उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरले होते. यासाठी काँग्रेस पक्षाकडून गटनेते प्रकाश डिचोलकर यांनी व्हीप जारी केला होता. मात्र, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या व सध्या भाजपमध्ये असलेल्या काही नगरसेवकांनी या व्हिपला केराची टोपली दाखवली. त्यामुळेच वेंगुर्ले नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने आपला झेंडा रोवला आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नगरपरिषदेची राजकीय समीकरणे बदलली होती. अपक्ष म्हणून निवडून आलेले तुषार सापळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आजच्या उपनगराध्यक्षच्या निवडणुकीत तुषार सापळे  तटस्थ राहिले. त्यामुळे हा एक शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या  निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. अवघे दोन महिने निवडणुकीसाठी शिल्लक आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सहित भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने बजावलेला व्हिप आणि काँग्रेस पक्षावर निवडून येऊन भाजपच्या गोटात जाणाऱ्या नगरसेवकांनीही नाकारल्याने येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप ही राजकीय लढाई वेंगुर्लात पाहायला मिळणार आहे.

वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये सत्ताधारी भाजपची सत्ता आहे नगराध्यक्ष भाजपचे असून एकूण 17 नगरसेवक्त भाजप 7, काँग्रेस 7, शिवसेना 2, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. मागच्या शिवसेना भाजपची युती काळात शिवसेनेच्या अस्मिता राऊळ उपनगराध्यक्ष होत्या. त्यांनी राजीनामा दिल्याने आज विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्राताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भाजपकडून शीतल आगचेकर तर काँग्रेसकडून विधाता सावत यांनी उमेदवारी भरली. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विधाता सावंत यांना 7 तर शीतल आगचेकर यांना 10 मते मिळाली एक तटस्थ राहिला. यावेळी मतदान प्रक्रिया हात उंचावून करण्यात आली. राज्यात महाविकास आघाडी असतानाही व्हिपचा अनादर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी केल्याने महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
Embed widget