Nishikant Dubey slams Thackeray Brothers: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली आहे. संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राचं योगदान काय, असा सवाल निशिकांत दुबे (MP Nishikant Dubey) यांनी विचारला आहे. त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत भाष्य केले. महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो. तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं? टाटा , बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचं शोषण करुन दादागिरी करता, अशी गरळ निशिकांत दुबे यांनी ओकली.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना लक्ष्य करत आहेत. तुम्हाला मारायचं असेल तर मग मुंबईतील तामिळी, तेलुगु आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारा. स्वत:च्या घरात सगळेच राजे असतात. राज आणि उद्धव ठाकरे यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशात येऊन दाखवावं, तिकडे त्यांनी उचलून आपटतील. आम्ही मराठीचा सन्मान करतो पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले.
Uddhav Thackeray & Raj Thackeray:बाळासाहेबांचे खरे वारसदार असाल तर माहीमच्या दर्ग्यासमोर जाऊन...; ठाकरे बंधूंना खासदार निशिकांत दुबेंचं ओपन चॅलेंज
मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांची आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय युतीच्या दिशेने पावले पडण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आता ठाकरे बंधूंवर प्रतिहल्ला करायला सुरुवात केली आहे. यासाठी भाजपने स्थानिक नेत्यांसोबत उत्तरेतील खासदारांना कामाला लावल्याचे दिसत आहे. कारण भाजपचे उत्तर भारतातील खासदार सध्या ठाकरे बंधूंवर अत्यंत आक्रमक आणि विखारी भाषेत टीका करु लागले आहेत. निशिकांत दुबे यांनी गेल्या 24 तासांमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आम्ही मराठी स्वातंत्र्य सेनानींचा सन्मान करतो. मराठी स्वातंत्र्यसैनिकांचं भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान आहे. मात्र, आज महाराष्ट्रात व्होटबँकेच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या जे काही करत आहेत, त्यापेक्षा खालच्या दर्जाचं काहाही नसू शकते. आम्ही याचा प्रतिकार करणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माहीमच्या दर्ग्यासमोर जाऊन हिंदी किंवा उर्दू भाषिकाला मारुन दाखवावं. तरच मी मान्य करेन की, उद्धव आणि राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत, अशी टीका निशिकांत दुबे यांनी केली.
आणखी वाचा