पुणे : नुकतेच मंत्री झालेले नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधानक केले आहे. केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान आहे. दहशतवादीच राहुल  गांधी यांना मतदान करतात, असं मोठं विधान नतिश राणेंनी केलंय.


केरळमधल्या भावाने 12 हजार हिंदू भगिनींचं...


पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिन अफजलखानाचा वधाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नितेश राणे उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वरील विधान केले. "आमचे केरळवरून जे मित्र आले आहेत, त्यांच खरंच कौतुक करायला पाहिजे. त्यांनी 12 हजार मुलींना सोडवलं. आपल्या एका भगिनीला घरी आणण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते आमच्यासारख्या हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांना विचारा. पण या केरळमधल्या भावाने 12 हजार हिंदू भगिनींचं आयुष्य वाचवलं. केरळसारख्या राज्यात त्यांनी हे काम करून दाखवलंय," असे नितेश राणे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.


केरळ राज्य मिनी पाकिस्तान


तसेच पुढे बोलताना,"केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान आहे. म्हणूनच राहुल गांधी आणि त्यांची बहीण तेथून निवडून येतात. सगळे अतिरेकीच त्यांना मतदान करत आहेत. मी खरं बोलतोय. अतिरेकींना हाताशी धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत," असं थेट विधानही नितेश राणे यांनी केलंय.


तुमच्या हक्काचा माणूस सरकारमध्ये बसलाय फक्त एक फोन करा


आमच्या मिरवणुका जर दहा वाजेपर्यंत चालत असतील तर मोहर्रमच्या आणि ईदच्या मिरवणुकादेखील दहा वाजेपर्यंत चालल्या पाहिजेत. आपण बोलणारे कमी आणि कार्यक्रम करणारे जास्त आहोत. तुमच्या हक्काचा माणूस सरकारमध्ये बसलाय फक्त एक फोन करा. बेकायदेशीर माणसाला कसं थरथर कापावे लागते ते कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.


Nitesh Rane Video News :



हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी...


"हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मला सल्ला द्यायचा आहे की तुम्ही एकटे नाही. आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत.राज्यात भगवादारी मुख्यमंत्री म्हणून तिथे आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही घाबरायची गरज नाही. हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी बेकायदेशीर वागणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. मंत्री असल्याने आता बंधन आलेत. यापुढे हिंदुत्वाचे काम ताकदीने पुढे चालू ठेवा, असा सल्लाही त्यांनी हिंदुत्त्वादी कार्यकर्त्यांना दिला. 


हेही वाचा :


पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला


Ajit Pawar: अजित पवारांचा बारामतीमध्ये 20 हजार मतांनी पराभव; 150 मतदारसंघात गडबड, शरद पवारांच्या पक्षातील आमदाराच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या


जुनंच मंत्रीपद कायम ठेवलं, आता पालकमंत्री पदही कायम राहील; मंत्री संजय राठोड यांचा निर्धार, म्हणाले...