Maharashtra Guardian Ministers : राज्यात 36 जिल्हे आहेत, त्यापेक्षा जास्त मंत्री आहे. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी वरिष्ठ निर्णय घेईल तोच निर्णय योग्य राहील आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडील. मात्र माझ्याकडे आधी पालकमंत्री पद आणि जलसंधारण पद होतं आणि आता माझ्याकडे पुन्हा जलसंधारण मंत्री पद कायम आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदही कायम राहण्याची अपेक्षा आहे. याचा वरिष्ठ निर्णय घेईलच, अशी प्रतिक्रिया जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली आहे. 


मृद व जलसंधारण मंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मंत्री संजय राठोड हे पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. यावेळी संजय राठोड यांनी दीनदयाल प्रबोदिनी येथे भेट दिली. तसेच ग्रामदैवत असलेल्या वनवाश्या मारुती येथे जाऊन आरती करून आशिर्वाद घेतला. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्याअर्पण केले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.


मंत्रीपदे आणि खाते यांच्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच रस्सीखेच आता देखील पालकमंत्रिपदासाठी (Maharashtra Guardian Ministers List) पाहायला मिळत आहे. 36 पैकी 11 जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्तच तीव्र असल्याचं दिसत आहे. पुणेरायगडनाशिक, संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्रिपदासाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार असल्याच्या चर्चा होत्या. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.


पालकमंत्रिपदावरून कुठे संघर्ष? 
जिल्हा : ठाणे


एकनाथ शिंदे, शिवसेना
गणेश नाईक, भाजप
----------------------------
जिल्हा :जळगाव


गुलाबराव पाटील, शिवसेना
संजय सावकारे, भाजप
----------------------------
जिल्हा : बीड


पंकजा मुंडे, भाजप
धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
----------------------------
जिल्हा : यवतमाळ


अशोक उईके, भाजप
संजय राठोड, शिवसेना
इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी
----------------------------
जिल्हा : सातारा


शंभुराज देसाई, शिवसेना
शिवेंद्रराजे भोसले, भाजप
जयकुमार गोरे, भाजप
मकरंद पाटील, राष्ट्रवादी
------------------------
जिल्हा :कोल्हापूर


हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
प्रकाश अबिटकर, शिवसेना


संजय राठोड हे पाचव्यांदा निवडून आले


संजय दुलीचंद राठोड हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांनी यावेळी पाचव्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांचा 28,775 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत त्यांना 143,115 मतं मिळाली. संजय राठोड हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ही 2024 विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर ही त्यांची पाचवी टर्म असणार आहे. यापूर्वी त्यांनी 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये निवडून आले आहेत.


इतर महत्वाची बातमी