एक्स्प्लोर

कोलांट्याउड्या मारण्याची स्पर्धा असती तर शरद पवारांना सुवर्णपदक मिळालं असतं: गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar On Sharad Pawar: 2029 ला शरद पवारांचा पक्षच राहणार नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

Gopichand Padalkar On Sharad Pawar सांगली: सांगलीमधील विटामध्ये भाजपचे नेते पंकज दबडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला आमदार नितेश राणे (Nitesh Rane), आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), आमदार सदाभाऊ खोत एकत्र आले होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. 

कोलांट्याउड्या घेण्यामध्ये सुवर्णपदक द्यायची जर वेळ आली, तर यासाठी जगात एकमेव नाव शरद पवार (Sharad Pawar) यांचे आहे. कारण शरद पवारांनी इतक्या कोलांट्यउड्या त्यांच्या राजकारणामध्ये आतापर्यंत घेतल्या आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. शरद पवार यांच्या पक्षात जे प्रवेश करत आहेत त्यांची तर आता कीव वाटतेय. कारण 2024ची निवडणूक ही शरद पवारांच्या पक्षाची शेवटची निवडणूक आहे. 2029 ला शरद पवारांचा पक्षच राहणार नाही, मग आज  शरद पवारांच्या पक्षात जात असलेले 2029 नंतर मग कोणत्या पक्षात जाणार?, याचा त्या लोकांनी आधी विचार करावा, असा टोला देखील गोपीचंद पडळकर यांनी लगावला.

जरा वेळ जाऊ द्या...- गोपीचंद पडळकर

महाविकास आघाडीमधील जो-तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडतायत. पण देवेंद्र फडणवीसांची आज वेळ खराब असेल, नशीब नाही. जरा वेळ जाऊ द्या..., असं गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच ऊठसूट ज्या भानगडी सुरु आहेत, त्या बंद होतील, असा सूचक इशारा देखील गोपीचंद पडळकर यांनी दिला. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा या भागातील टँकरचे  मोर्चे संपले, चारा छावणीची मागणी संपली. कारण केंद्रातून आणि राज्यातून एका वेळी 50 हजार कोटी महाराष्ट्रच्या योजनांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मिळवून दिले असंही गोपीचंद पडळकरांनी सांगितले. 

नितेश राणे काय म्हणाले?

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचे सरकार आले, तर आम्ही जेलमध्ये असू, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आले तर आम्हाला हे लोक बाहेर ठेवणार नाही. मला तर पहिल्या 100 दिवसातच आतमध्ये टाकतील. चुकून मविआचे सरकार आले तर आम्ही जेलमध्ये असू , आम्ही 6 महिन्यातच कोल्हापूरच्या जेलमध्ये  गोट्या खेळत असू, असं नितेश राणे म्हणाले. तसेच मी बॅग भरून ठेवली आहे, पण मी पुन्हा भाजपला निवडून आणण्याचा निर्धार करुन बाहेर पडलोय, असं नितेश राणे यावेळी म्हणाले. 

संबंधित बातमी:

शिवाजी महाराजांचा नवा पुतळा साकारण्याची जबाबदारी या अनुभवी शिल्पकाराला; अजित पवारांचे संकेत, म्हणाले....

संबंधित व्हिडीओ:

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Embed widget