Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज (06 ऑक्टोबर) कर्नाटकातील भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सामील झाल्या. कर्नाटकातील मंड्या इथे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. सोनिया गांधी राहुल यांच्यासोबत काही अंतर चालल्या. या पदयात्रेदरम्यान खास क्षण पाहायला मिळाला. पदयात्रेत सहभागी झालेल्या सोनिया गांधी यांच्या शूजचे लेस निघाल्याचं राहुल गांधी यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेचच आईचे शू लेस बांधले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.
राहुलने आईच्या खांद्यावर हात ठेवून स्वागत केले. यानंतर यात्रेत उपस्थित महिला नेत्यांनी सोनिया गांधींचा हात हातात घेतला. सुमारे 15 मिनिटे चालल्यानंतर राहुल यांनी सोनिया गांधींना परत कारकडे पाठवले. मात्र, काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सोनिया गांधई पुन्हा पदयात्रेत सहभागी झाल्या. सोनिया महिनाभरापूर्वीच कोरोनामधून बऱ्या झाल्या आहेत. सोनियांची प्रकृती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही.
एकीकडे अध्यक्षपदावरुन घमासान, दुसरीकडे भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा आज पांडवपुरा ते नागमंगला तालुक्यापर्यंत जाणार आहे. अध्यक्षपदावरुन पक्षात घमासान सुरु असताना सोनिया गांधी काँग्रेसच्या पदयात्रेत सहभागी झाल्या आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे.
मोठ्या काळानंतर सोनिया गांधींची सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी
सोनिया गांधी बऱ्याच दिवसांनी सोनिया एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात हजर झाल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रचारही केला नव्हता. भारत जोडो यात्रा सुरु असताना सोनिया गांधी परदेशात उपचार घेत होत्या. त्यावेळी त्यांच्या आईचंही निधन झालं. प्रियांका आणि राहुलही सोनियांसोबत इटलीला गेले होते. सोनिया गांधी काही दिवसांपूर्वीच भारतात परतल्या आहेत.
काँग्रेसचा दक्षिण भारताशी संबंध
सोनिया गांधी यांचा कर्नाटकशी फार मोठा संबंध आहे. गांधी घराण्यावर जेव्हा जेव्हा राजकीय संकट आले, तेव्हा दक्षिण भारताने तो सावरलं. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही दक्षिण भारतातील मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांचं सरकार गेलं तेव्हा 1980 मध्ये त्यांना लोकसभेच्या सुरक्षित मतदारसंघाची गरज होती. अशा परिस्थितीत त्यांनी कर्नाटकातील चिकमंगळूरमधून निवडणूक लढवली. इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील मेडक आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, नंतर त्यांनी रायबरेलीची जागा सोडली.
VIDEO : Sonia Gandhi : भारत जोडो यात्रेत सोनिया गांधींचा सहभाग, दीर्घ काळानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित