Opposition Unity In Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप कार्यक्रमात विरोधी पक्ष एका व्यासपीठावर एकत्र येऊ शकतात. यात्रेच्या समारोपात सहभागी होण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी बुधवारी अनेक राजकीय पक्षांना पत्र लिहिले आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी ट्वीट केले आहे की, "काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 30 जानेवारी रोजी भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभासाठी 21 समविचारी पक्षांच्या अध्यक्षांना आमंत्रित करणारे पत्र लिहिले आहे."


Bharat Jodo Yatra: खर्गे यांनी पत्रात काय लिहिलं? 


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रात लिहिले आहे की, ''कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेने आतापर्यंत 3300 किलोमीटरचे अंतर कापले आहे. या यात्रेत समतेचा अत्यंत साधा आणि चिरस्थायी संदेश आहे. भारतीयांनी या मूल्यांसाठी शतकानुशतके लढा दिला आहे आणि ते आपल्या संविधानात समाविष्ट आहेत.'' मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढे लिहितात की, ''उन्हाळा, हिवाळा आणि पावसात देखील दररोज यात्री 20-25 किमी चालत आहेत. त्यांनी या यात्रेचा संदेश लाखो लोकांपर्यंत पोहोचवला आहे. यात्रेच्या सुरुवातीपासूनच आम्ही प्रत्येक समविचारी भारतीयाला प्रवासात येण्याचे निमंत्रण दिले आहे. राहुल गांधींच्या निमंत्रणावरून अनेक राजकीय पक्षांचे खासदारही वेगवेगळ्या टप्प्यांवर यात्रेत सहभागी होत आहेत. 30 जानेवारी रोजी श्रीनगर येथे होणाऱ्या भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभाला मी तुम्हाला वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करतो.''


त्यांनी लिहिले की, या कार्यक्रमात द्वेष आणि हिंसाचाराशी लढण्यासाठी, सत्य, करुणा आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी. तसेच स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि सर्वांसाठी न्याय या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आपल्या देशावरच्या या संकटाच्या काळात, जिथे लोकांचे लक्ष सार्वजनिक प्रश्नांवरून पद्धतशीरपणे वळवले जात आहे, तिथे ही यात्रा एक शक्तिशाली आवाज म्हणून उदयास आली आहे. मला आशा आहे की, तुम्ही त्यात सामील व्हाल आणि याच्या संदेशाला आणखी मजबूत कराल.




दरम्यान, भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेसने टीएमसी, जेडीयू, शिवसेना, टीडीपी, राष्ट्रवादी, एनसी, समाजवादी पक्ष, बीएसपी, डीएमके, सीपीआय, सीपीएम, जेएमएम, आरजेडी, आरएलएसपीसह आणखी सात पक्षांना निमंत्रण दिलं आहे.