Hasan Mushrif ED Raids: राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कोल्हापूर (Kolhapur) आणि पुण्यातील (Pune) घरांवर ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आले आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात अंदाजे 1500 कोटींचा कथित घोटाळाच्या आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला होता. त्यानंतर ही कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया आली आहे. अशाप्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. तर फक्त ठरवून काही पक्षांवर अशी कारवाई करणे देखील योग्य नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
तर यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचे असल्याचं पवार म्हणाले. ठाकरे गटातील राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक यांच्यावर राज्यसरकारच्या अंतर्गत येणाऱ्या तपास यंत्रणाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे याला राजकीय रंग आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाहक त्रास कोणाला होता कामा नाही. अनिल देशमुखांवर कारवाई झाली पण कोणतेही पुरावे मिळाले नाही. संजय राऊत यांच्यासोबत देखील असेच झाले. हे सर्व प्रकार देशाला आणि राज्याला परवडणारे नाही, असे अजित पवार म्हणाले.
सकाळी 6 वाजेपासून छापेमारी
हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील घरांवर ईडीकडून सकाळी 6 वाजेपासून छापेमारी सुरु आहे. ईडीकडे किरीटी सोमय्यांनी दाखल दाखल केलेल्या तक्रारीत अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. कोणताही अनुभव नसतांना कारखाना चालवण्यात आला असून, तब्बल 1500 कोटींचा हा घोटाळा झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर ही छापेमारी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
सोमय्यांचं डोकं तपासले पाहिजे...
यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्यात की, ईडीकडून छापेमारी आता काही नवीन नाही. यापूर्वी देखील अनेक नेत्यांवर कारवाई झाली. पण पुरावे नसल्यानी त्यांची सुटका झाली आहे. मुळात किरीट सोमय्यांचं डोके तपासले पाहिजे. फक्त राष्ट्रवादीच्या लोकांविरोधातच कशी कारवाई होते. भाजपच्या लोकांवर कशी कारवाई होत नाही असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला.
आणखी काही संबंधित बातम्या: