Bharat Gogawale, रायगड : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. गोरगरीब जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारला पुन्हा सत्ता मिळो अशी प्रार्थना केली. गणारायाकडून आम्हाला कृपा आशीर्वाद मिळेल.   आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा आमदार होण्यासाठी बाप्पा समोर गाऱ्हाणे मांडले. 


छञपती शिवाजी महाराज यांची कामे पुसली जाऊ शकत नाहीत


भरत गोगावले म्हणाले, जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत छञपती शिवाजी महाराज यांची कामे पुसली जाऊ शकत नाहीत. स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतवर स्वारी केली होती. स्वारी करत असताना अनेक घटना घडल्या.  यामध्ये गडकिल्ल्यांचे डागडुजी आणि जनतेची सेवा करण्यासाठी  ही स्वारी राजांनी केली होती.  महाराष्ट्राच्या हितासाठी ही स्वारी होती.  राजांनी स्वताच्या मोजमजेसाठी स्वारी केली नव्हती.  त्यांनी केलेलं हे काम राज्याच्या जनतेला हेवा वाटण्यासारखं आहे. त्यांच्या या स्वारीचे काम कधीच पुसले जाऊ शकत नाही. 


जर काही वाद असेल तर तो आम्ही मिटवून घेऊ


पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले, रायगडमधील संघर्ष हा वादळापूर्वीची शांतता आहे.  आमच्या तिन्ही पक्षातील प्रमुख  रायगड जिल्ह्यांत सुरू असलेली कुजबुज आहे ती संपवून टाकतील. गुलाबराव पाटील हे अर्थ खातं संभाळणाऱ्या माणसाला म्हणाले नाहीत. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची आम्ही चौकशी करू.  कुठल्या कारणास्तव ते म्हणाले याचा आम्ही विचार करू. जर काही वाद असेल तर तो आम्ही मिटवून घेऊ.


Manoj Jarange : मी राजगादीला मानतो हे उदयराजेंना माहितीये, बार्शी मराठ्यांचं घर घोंगडी बैठक होणार, राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार, त्यापेक्षा तो सोपल बरा : मनोज जरांगे