रायगड : महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगडच्या (Raigad) पालकमंत्री पदावरुन असलेला वाद आता महाराष्ट्राला परिचीत आहे. सध्या तरी रायगडच्या पालकमंत्रीपदावर कुठल्याही मंत्र्‍याची नियुक्ती केली नसली तरी देखील 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा मान पुन्हा एकदा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. शासनाने परिपत्रक जारी करत कोणत्या मंत्र्‍यांनी कुठे ध्वजारोहण करायचे हे सांगितलं आहे. त्यामुळे, आता पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना (Aditi tatkare) मिळणार असल्याची चर्चा पुन्हा होत आहे. तर, काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर पालकमंत्रीपदासंदर्भाने भरत गोगावले (Bharat gagavale) यांचा सूरही बदलल्याचे दिसून आले होते. त्यामुळे, आज पुन्हा एकदा भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपद किस बात की चीज है... असे म्हणत एकप्रकारे आपला दावाच सोडल्याचं दिसून आलं. 

Continues below advertisement


रायगडमधील माणगाव येथे शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा संपन्न झाल्यानंतर भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलतना पालकमंत्रीपदावर भाष्य केलं. ''ज्या मावळ्यांनी अडीच वर्षासाठी मंत्रिपद सोडले त्याला पालकमंत्री किस बात की चीज है, असे म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरुन आपली भूमिका मांडली.  महाराष्ट्राच्या इतिहासात पालकमंत्रिपद सोडण्याने इतिहासात माझं नाव कोरलं गेले आहे. मात्र, बाबा मुख्यमंत्री आणि मी सुद्धा मंत्री व्हायला पाहिजे असे एकनाथ शिंदे यांनी केलं नाही,'' असे म्हणत भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर आपला रोष दर्शवला. 


दरम्यान, महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचे वजन कमी पडताना दिसत आहे का? असा सवाल भरत गोगावले यांना विचारला असता, अस अजिबात नाही. एकनाथ शिंदेंचे वजन कमी पडले असते तर आम्ही उठाव केलेल्या पालकमंत्री पदावर स्टे आला नसता, असेही गोगावले यांनी म्हटले. 


भरत गोगावलेच पालकमंत्री होणार - महेंद्र थोरवे


अदिती तटकरेंच नाव जरी झेंडा वंदनासाठी जाहीर झालं असलं तरी भरतशेठच रायगडचे पालकमंत्री असणार आहेत. सुनील तटकरेंनी आतापर्यंत जे काही केलं ते सगळ जगजाहीर आहे. माझ्या मतदारसंघात देखील त्यांनीच उमेदवार उभा केला, आणि त्याला आर्थिक पाठबळ दिले. सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, आता आमची वेळ आहे, असे म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला. पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री यांना पूर्ण कल्पना आहे, ते योग्य तो निर्णय घेतील. दरम्यान, अजित दादांनी सुद्धा मुख्यमंत्री यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत बोट दाखवलं होतं. मात्र, त्यावर थोरवे यांनी सौम्य प्रतिक्रिया दिली.


हेही वाचा


मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जिवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले