मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सार्वजनिक गणेश मंडळे कामाला लागली आहेत. यंदाही दणक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळे आणि भाविक उत्साही दिसून येत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मुंबईतील (Mumbai) सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे, त्याचा एक आराखडा तयार केला असून तो लवकरच जाहीर होईल. गणेशोत्सव उत्साहात साजरा करा, गणेशोत्सवावर काही संकटं आली होती, ती विघ्नहर्त्यानेच दूर सारली. तर, अग्निशमन दलाचे बंब वापरण्यासाठी लालबागचा राजा (lalbaugcha raja) गणेश मंडळांकडून दिवसाला सव्वा लाख रुपये आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावरही मुख्यमंत्र्‍यांनी भूमिका मांडली.

गणेशोत्सव काळात पोलिस विभागाने योग्य समन्वय राखावा, पुण्यात विसर्जन मिरवणुकांचे नीट नियोजन करावे. तसेच, 'ऑपरेशन सिंदुर' आणि विकसित राष्ट्राचा प्रवास सुरू असताना जे अडथळे येत आहेत, ते पाहता 'स्वदेशी' या दोन विषयांवर जनजागरण कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्‍यांनी गणेश मंडळांना केले आहे. मुख्यमंत्र्‍यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे मुंबई अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनीही झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यामध्ये, मुंबईतील लालबागचा राजाच्या मंडपाबाहेरील दिवसाला सव्वा लाख रुपये भराव्या लागणाऱ्या 'त्या' सुविधेचे भाडे कमी होणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसेच, गणेश मंडळांवर कृपादृष्टी दाखवली असून मंडपासाठीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे पैसे माफ होणार आहेत, असेही यांनी सांगितले.  Dदरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, समन्वय समितीसोबत ही बैठक झाली. काही प्रश्न मार्गी लागले होते, मात्र आज काही पेडिंग होते, आगामी आगमनाची मिरवणूक होणार आहे, त्यासाठी गर्दी होते त्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच, प्लास्टर ऑफ पॅरिससंदर्भात निर्णय मर्यादित ठेवला आहे, अशात कायमस्वरूपी दिलासा त्यात द्यावा अशी मागणी आपण केली आहे. गणेशोत्सवासंदर्भातील एसओपीत दुरुस्ती केल्यास ते होऊ शकते, याबाबत काकोडकर यांचा अहवाल लवकरात लवकर येऊ द्या. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, त्यानुसार परवानगी मिळावी अशी मागणी केल्याचे दहिबावकर यांनी सांगितले.  

लालबागचा राजा येथील अग्निशमन बंबांना सवलत

मुंबईतील अनेक गणेश मंडळांजवळ अग्निशमन दलाचे बंब असतात ते लालबागचा राजा इथेही उभे असतात. मात्र, या सेवेसाठी महापालिकेकडून सव्वा लाख रुपये दिवसाला (24 तासासाठी) चार्ज केले जातात. मात्र, लालबागचा राजाचा इथे उभे असलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाच्या रकमेत सूट द्यावी, अशी मागणी मंडळाने केली होती. त्यास, मुख्यमंत्र्‍यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच, गणेश मंडळाच्या खड्ड्यांबाबत 15 हजार रुपये प्रति खड्डा घेणार होते, तो आता 2 हजार रुपये करण्यात आला आहे. मात्र, 2 हजार रुपये देखील माफ होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती नरेश दहिबावकर यांनी दिली.  

विसर्जनदिवशी सुट्टी मिळावी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 26 तारखेला मराठा बांधव मुंबईत येणार आहेत, त्याचे नियोजन देखील होणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून गणेश विसर्जनादिवशी मुंबईत सुट्टी मिळत असताना यंदा ती रद्द केली आहे. खासगी लोकांचा अनंत चतुर्दशी संदर्भात विचार करा आणि सुट्टी जाहीर करा, अशी मागणीही गणेश मंडळांनी केली आहे. 

हेही वाचा

पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे स्पष्ट मत, कबुतरखान्यासंदर्भात न्यायालयात आज काय घडलं?