एक्स्प्लोर

Beed Railway: बीड-पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबरपासून धावणार, बीड ते मुंबई रेल्वे डिसेंबरमध्ये सुरु होणार; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सुनेत्रा पवारांच्या सूचना

Beed Railway: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी 'बीड–पुणे' रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार आहे.

Beed Railway मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी 'बीड–पुणे' रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज दिल्या. (Beed To Pune Railway)

सह्याद्री अतिथीगृह येथे 'अहिल्यानगर–बीड–परळी' रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच 'बीड–पुणे' आणि 'बीड–मुंबई' रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बीडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या 'बीड–पुणे' आणि 'बीड–मुंबई' रेल्वे सेवेसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे 'अहिल्यानगर–बीड–परळी' या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली. गतवर्षी बीडकरांची 40 वर्षांची प्रतीक्षा संपवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी (17 सप्टेंबर 2025 रोजी) 'बीड ते अहिल्यानगर' रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू झाली आणि आता यावर्षी त्याच ऐतिहासिक दिनी 'बीड–पुणे' रेल्वे सेवा सुरू होत आहे. (Beed To Mumbai Railway)

 बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी या रेल्वे जोडणीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार- सुनेत्रा पवार (Beed Railway Connecting)

'बीड–पुणे' रेल्वे सुरू झाल्यानंतर जिल्ह्याची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट व अधिक सक्षम रेल्वे जोडणी निर्माण होणार आहे. यामुळे बीडच्या कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि व्यापार क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून नागरिकांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यासही मदत होणार आहे. बीडच्या आर्थिक विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रापवार यांनी सूचना देताना सांगितले की, 17 सप्टेंबर रोजी 'बीड–पुणे' रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी उर्वरित सर्व तांत्रिक, प्रशासकीय व सुरक्षाविषयक प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात. त्याचबरोबर डिसेंबर अखेर 'बीड–मुंबई' रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून आवश्यक कामांचा कालबद्ध आराखडा तयार करून सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या 'बीड–पुणे' रेल्वे सेवेच्या ऐतिहासिक शुभारंभ कार्यक्रमाची सर्व तयारी अत्यंत नियोजनबद्ध, प्रभावी आणि समन्वयाने करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. 'बीड–पुणे' आणि पुढे 'बीड–मुंबई' ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी आहे. दिवंगत अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी या रेल्वे जोडणीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
Praniti Shinde on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
Manoj Jarange Patil: देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? मनोज जरांगेंचं स्फोटक वक्तव्य
देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? मनोज जरांगेंचं स्फोटक वक्तव्य
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
Praniti Shinde on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Abhay Oka: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
Mumbai Local Train Central Railway: मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
Manoj Jarange Patil and Sanjay Raut: संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
Embed widget