Jayant Patil: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधकांमध्ये विविध प्रश्नांवर खडाजंगी पाहायला मिळत असून विरोधक सरकारला घेताना दिसून येत आहेत. दरम्यान बीड मधून जयंत पाटलांनी सरकारला चांगलंच सुनावलंय. भारतातल्या कांद्याला मारायचं आणि पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचं हे केंद्राचं धोरण असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आढावा घेत आहेत. आज ते बीडमध्ये होते. विधानसभेसाठी जिल्ह्यातील तयारीचा रोड मॅप ठरवताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
लोकसभेतील विजय घटक पक्षांच्या मेहनतीमुळेच
बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या सोपा नाही. इथले प्रश्न दिल्लीत बसून सोडवायची गरज होती. बीडचा प्रश्न सोडवायचा असेल तर अतिरिक्त पाणी आणावं लागेल असं म्हणत लोकसभेतील विजय घटक पक्षातील मेहनतीमुळेच झाला असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
पीक विम्याचा प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी
पीक विम्याचा प्रश्न सरकारला सोडवता आला नाही. पिक विमा मध्ये सगळ्यांचेच हात ओले होतात असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी सरकारवर केला आहे . भारतातल्या कांदा निर्यातीवर कर तो ही 40%! भारतातल्या कांद्याला मारायचं आणि पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचं हे केंद्र सरकारचे धोरण आहे. निवडणुका आल्या आहेत आता कपडे काढून द्यायलाही हे तयारअसल्याची जोरदार टीका जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर केली आहे.
अणूऊर्जावर आधारित कांदा महाबँक (Onion Mahabank) निर्मितीची घोषणा काल राज्य सरकारने (State Government) केली. या घोषणानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर अशा काही ठिकाणी कांद्यासाठी (Onion) महाबँक होणार आहेत. मात्र या घोषणेनंतर सर्वाधिक कांद्याचा उत्पादन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा: