बीड :  पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde)  प्रचारार्थ बीडमध्ये प्रचारसभा पार पडली या सभेतून अजित पवारांनी (Ajit Pawar) मविआ उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  दोन पैसे हाती आले की मस्ती येते असे म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंवर निशाणा  साधला आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. तसेच 'मोदींच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना घेण्यासाठी मी प्रयत्न करणार, असे आश्वासन देखील अजित पवारांनी यावेळी दिले. 


अजित पवार म्हणाले, पंकजाताईच्या विरोधात बजरंग उभा आहे तो सारखा माझ्याकडे यायचा. माझ्या कारखान्याची कॅपसिटी वाढवून द्या, अशी मागणी करायचा. मी देत नव्हतो पण धनंजय मुंडेंनी वाढवून  द्यायला सांगितली.   मी धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की वेसन हातात ठेवायला पाहिजे होते. धनुभाऊ कधी माणसं कळत नाही, म्हणून त्याची गाडी बिघडते. तू माझा सल्ला घेत जा .


दोन पैसे हाती आले की मस्ती येते : अजित पवार


अजित पवार म्हणाले,  बजरंगा तू सांगायाचा छाती पडला की हे दिसतो तो दिसतो.. अरे छाती फाडू नको छाती पडली की मरून जातो... तू स्वत:ला हनुमान समजायला लागला.. बजरंग सोनावणेचा बार्शी आणि बीडमध्ये कारखाना आहे. सगळ बर चालले होते, त्याला काय अवदसा आठवली काय माहिती आणि निवडणुकीला उभा राहिला. परंतु काहींना दोन पैसे हाती आले की मस्ती येते असे मस्ती त्याला आली.


माझ्याबरोबर राहिला आणि मला आता सोडलं : अजित पवार


इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि मला आता सोडले.  मी एवढं सगळं देऊन तो मला सोडून जाऊ शकतो तर तो तुम्हाला किती वेळा सोडू शकतो. अरे हा पट्ठ्या स्वत: खासदारकीला पडला.  स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत सदस्य करू शकला नाही. स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत, नगरपालिकेला  निवडून आणू शकला नाही तो खासदार बनायला निघाला, असेही अजित पवार म्हणाले. 


मोदींच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना घेण्यासाठी मी प्रयत्न करणार : अजित पवार 


आमदारकीला कोणाला तिकिट द्यायचा कोणचा पत्ता कट झाला याचा विचार तुम्ही करु नका. तुम्ही पंकजा मुंडेचे काम करा जो पंकजा मुंडेंचे जास्त काम करेल त्याचा विचार मी नक्की करेल,  मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये पंकजा ताईंना घ्या अशी शिफारस स्वतः अजित पवार करणार आहे.  कुणी कुणाचा कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू नसतो, असे देखील अजित पवार म्हणाले. 


Ajit Pawar Beed Sppech Video :



हे ही वाचा :


हेलिकॉप्टरने एंट्री, कॉलर उडवून फ्लाईंग किस, पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजेंची फुल्ल हवा