Sharad Pawar and Supriya Sule on Majha Maha Katta : माझ्या लग्नात बाबांपेक्षा बाळासाहेबांनीच सर्वाधिक केलं, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा महाकट्टा' (Majha Maha katta) या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.
तुम्हाला जावयाकडून काय अपेक्षा होत्या? लग्नाच्या प्रोसेसमध्ये शरद पवार होते का? असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांचा झिरो रोल होता. माझी आई आणि बाळासाहेब ठाकरेंचा जास्त रोल आहे माझ्या बाबांपेक्षा, असे त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि माधव आपटे यांनी केलं सजेस्ट
यावेळी शरद पवार म्हणाले की, प्रॅक्टीकली माझा त्यात काहीच रोल नव्हता. आमच्या काही जवळच्या मित्रांनी सजेस्ट केल. मग त्यात बाळासाहेब ठाकरे असतील किंवा माधव आपटे असतील. माधव आपटे म्हणजे उद्योजक. तर या दोघांनी हे सजेस्ट केल. त्याचे कारण कदाचित माझ्या जावयाचे वडील आणि ते मित्र होते. तुम्हाला वाटले होते का की आपल्या मुलीचे लग्न जमवावे लागेल की लग्न जमून येईल, अशी तुम्ही मनाची तयारी करून ठेवली असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, मित्रांनी सजेशन केले होते. मग हे दोघे भेटले आणि ठरवलं. साधारणतः जवळचे लोक सुचवतील तो जावई, असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.
त्यांची इंटरेस्टची क्षेत्र वेगळी
तुम्ही नातवांना गाईड करतात, पवार कुटुंबापासून राजकारण वेगळे करणे कठीण आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांना तुम्ही कसे मार्गदर्शन करतात? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, इंटरेस्ट असला तरच तो विषय निघेल. बऱ्याचदा त्यांना या सगळ्या राजकीय गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. त्यांची इंटरेस्टची क्षेत्र वेगळी आहेत.
माझे बाबा आणि आई फुल टाईम आजी-आजोबा
दिवाळीतील चार दिवस पवार कुटुंबीय बारामतीत जमतात. या काळात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. त्या सुप्रिया सुळे असतात का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, सगळेच असतात. त्यात वर्गवारी आहे. यंगस्टर मुली साधारण चौदा, पंधरा, सोळा या वयातील त्यांचा एक ग्रुप वेगळा असतो. त्यांचे वेगळे जाणे, येणे, गप्पा-गोष्टी, त्यांचे वेगळे कार्यक्रम असतात. आम्ही सिनियर जनरेशन आहे. ती नवीन काही करायचं का किंवा तुम्ही काही करताय का? कशात कांही सुधारणा करायची गरज आहे का? अशा विषयांवर चर्चा होत असते, असे त्यांनी म्हटले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझे बाबा आणि आई हे फुल टाईम आजी-आजोबा आहेत. मला माझ्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय हे माहित नसते पण त्यांना सर्व माहित असते.
आणखी वाचा
मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार, माझा महाकट्टावर भूमिका मांडली!