एक्स्प्लोर

Bageshwar Baba: बागेश्वर बाबांकडून जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, भंडाऱ्यात तणाव, अटकेची मागणी

Bhandara News: दुपारी 4 वाजेपर्यंत अटक करा अन्यथा कायदा हातात घेऊ. परमात्मा एक सेवकांचा प्रशासनाला इशारा. महान त्यागी बाबा जुमदेवजी महाराजांबद्दल बागेश्वर महाराजांचं वादग्रस्त विधान. बागेश्वर महाराजांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

भंडारा: मानवधर्माची शिकवण देणाऱ्या बाबा जुमदेव महाराज आणि त्यांच्या परमात्मा एक सेवकांबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर महाराज यांनी भंडाऱ्याच्या मोहाडीतही काल सायंकाळी झालेल्या भागवत सप्ताहात केलं. बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यामुळे बाबा जुमदेव महाराज (Baba Jumdev) यांना मानणाऱ्या हजारो सेवकांच्या भावना दुखावल्या आहेत. या बागेश्वर महाराजांविरुद्ध (Bageshwar Baba) गुन्हे दाखल करून दुपारी 4 वाजेपर्यंत अटक करावी, सुरु असलेला कार्यक्रम बंद करावा अन्यथा बाबा जुमदेव महाराजांचे सेवक कायदा हातात घेऊन बागेश्वर महाराजांना अद्दल घडवतील आणि याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे. 

नेहमी वादग्रस्त विधान करून प्रसिद्धी झोतात राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन भंडाऱ्याच्या मोहाडीत करण्यात आले आहे. काल सायंकाळी झालेल्या भागवत सप्ताहात महानत्यागी बाबा जुमदेवजी ( महानत्यागी बाबा जुमदेव यांना मानणारा एक मोठा समुदाय पूर्व विदर्भात आहे) यांच्या आणि त्यांच्या सेवकांच्या विरोधात हनुमानजींच्या पुजेवरून भावना दुखावणारं वादग्रस्त विधान केलं. यामुळं भावना दुखावलेल्या परमात्मा एक सेवकांनी आणि बाबा जुमदेव महाराज यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी बागेश्वर महाराजांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात काल रात्री तक्रार दाखल केल्यात. यात आता राजकीय पक्षांच्या  नेत्यांनी उडी घेतली असून शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत बागेश्वर महाराजांवर गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली आहे.

बागेश्वर बाबा नेमकं काय बोलले?

नागपूर आणि भंडारा या क्षेत्रामध्ये एका विशेष संप्रदायाला मानणारा वर्ग आहे. ते हनुमानजींना तर मानतात. मात्र, हनुमानजींची पूजा करणे मानत नाही. श्राद्ध करायचं नाही, माता पित्यांचे फोटो ठेवायचे नाहीत, राम राम बोलायचं नाही, जय गुरुदेव बोला....जो हनुमान संपूर्ण जीवनभर रामराम बोलला, त्यांचे उपासक रामराम नाही बोलणार. हद्द झाली यार....रसगुल्ला खात आहेत...मात्र शुगर असल्याचे सांगत आहेत. असे करणाऱ्या लोकांनी कान उघडून ऐकावं की,तुमचे पूर्वज नरकात गेले आहेत, तुमची येणारी पिढी पण नरकात जाईल. अशी भक्ती हनुमानजींना कधीच प्रिय नाही, असे वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी भागवत सप्ताहात केले.


बागेश्वर महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर भंडाऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती

बागेश्वर बाबांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात लाखोंच्या संख्येत असलेल्या बाबा जुमदेवजी यांना मानणाऱ्या परमात्मा एक सेवकांमधुन रोष व्यक्त केला जातोय.  सोबतच बाबा बागेश्वरांना अटक करा, या मागणी करिता मोहाडी पोलीस स्टेशन येथे परमात्मा एक सेवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून बाबा बागेश्वरांना तात्काळ अटक करा, अशी मागणी या समुदायामार्फत केली जात आहे. बागेश्वर महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर मोहाडीमध्ये ठीक ठिकाणी बागेश्वर महाराजांचे बॅनर्स, पोस्टर्स फाडल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

आणखी वाचा

बागेश्वर बाबा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, रोहित पवारांची खोचक टीका

महत्त्वाच्या बातम्या

कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतलाय, खासदार देशमुखांचा ठाकरेंना टोला, म्हणाले आम्ही कायदेशीर लढाई लढण्यास तयार 
कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतलाय, खासदार देशमुखांचा ठाकरेंना टोला, म्हणाले आम्ही कायदेशीर लढाई लढण्यास तयार
पिसाळलेला श्वान चावला की माणूसही त्या श्वानाप्रमाणे बोलतो, तटकरेंचा रामदास कदमांवर पलटवार, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी त्यांना रुग्णालयात दाखवावं
पिसाळलेला श्वान चावला की माणूसही त्या श्वानाप्रमाणे बोलतो, तटकरेंचा रामदास कदमांवर पलटवार, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी त्यांना रुग्णालयात दाखवावं
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Shivsena : मोठी बातमी! ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांची खासदारकी वाचली, शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी 
मोठी बातमी! ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांची खासदारकी वाचली, शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी 

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget