Bachchu Kadu on BJP : भाजप मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष असल्याचं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) यवतमाळ येथे केलं होतं. दरम्यान, आता जानकर (Mahadev Jankar) यांच्या वक्तव्याचं आमदार बच्चू कडूंनीही समर्थन केलंय. भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं अन् काम झालं की सोडून द्यायचं, अशी असल्याचा टोला कडूंनी लगावलाय. शिवाय, भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरेंपेक्षा (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे चांगले असल्याचेही बच्चू कडू (Bachchu Kadu ) म्हणाले. ते अकोला (Akola) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 


अमरावती लोकसभेवर प्रहारचा दावा कायम 


बच्चू कडू म्हणाले, अमरावती लोकसभेवर प्रहारचा दावा कायम आहे. पक्षाकडे पाच-सहा उमेदवारांचा पर्याय आहे. नवनीत राणांना उमेदवारी द्यायच्या मुद्द्यावर कार्यकर्तेचं निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय. भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे,आमचाही असाच अनुभव आहे. चलती आहे तोपर्यंत सहन करु. भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं अन काम झालं की सोडून द्यायचं अशी आहे.  


महादेव जानकर काय म्हणाले होते?


भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचा वापर करून फेकून देतो, असा आरोप ठाकरे गटाचे प्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. त्यानंतर असाच आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला होता. भाजप (BJP) छोट्या पक्षांचा वापर करून फेकून देत असल्याचं जानकर म्हणाले होते. दरम्यान, असेच आरोप आमदार बच्चू कडू यांनी केले आहेत. दरम्यान, भाजपवर आरोप केले असले तरी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.  


शिवरायांच्या पुतळ्यावरुन राणा आणि बच्चू कडूंमध्ये वाद 


शिवरायांचा पुतळा बसवताना आमदार रवी राणा यांनी प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या मुद्यावरुन अमरावातीत राजकारण चांगलंच तापलं होतं.  या प्रकरणी बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली होती. आपण मंदिर तयार करताना कुणाची परवानगी न घेता बांधतो, तर मग शिवरायांचा पुतळा विना परवानगी बसविणे त्यात काय नवल आहे. मात्र हे करत असताना शिवरायांच्या नावाने कुणी राजकारण करू नये, असा टोला आमदार बच्चू कडू यांनी राणा यांना लगावला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadanvis On Sharad Pawar : शरद पवारांनी 40 वर्षांनी रायगड गाठला, याचं क्रेडिट अजितदादांनाच; देवेंद्र फडणवीस