एक्स्प्लोर

Avinash Jadhav On Prasad Vedpathak: जैनांसोबत पंगा, जीवे मारण्याची धमकी; प्रसाद वेदपाठकची मनसेकडे मदतीसाठी धाव, अविनाश जाधवांचा शब्द, म्हणाले...

Avinash Jadhav On Prasad Vedpathak: प्रसाद वेधपाठकने काल मनसेचे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीनंतर अविनाश जाधव यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.

Avinash Jadhav On Prasad Vedpathak: मुंबईत जैन साध्वींसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्टीचा (Jain Community White Line Controversy) मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठकने (Prasad Vedpathak) सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर मुंबईत रस्त्यांवर मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेत तात्काळ पांढऱ्या पट्ट्या हटवण्यात याव्या, अन्यथा आम्ही काळा रंग मारु, असा इशारा देण्यात आला. 

सदर प्रकरणानंतर माझ्या जीवाला धोका असल्याचा दावा प्रसाद वेदपाठकने केला आहे. काही लोक माझा पाठलाग करत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, प्लीज माझी मदत करा, असं म्हणत प्रसादने म्हटलं आहे. दरम्यान, प्रसाद वेधपाठकने काल मनसेचे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीनंतर अविनाश जाधव यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. तसेच मनसे नेहमी तुझ्यासोबत आहे, असा शब्दही अविनाश जाधव यांनी प्रसादला दिला. (Prasad Vedpathak Meet Avinash Jadhav)

अविनाश जाधव काय म्हणाले? (Prasad Vedpathak Meet Avinash Jadhav)

आमची बांधिलकी जनतेशी आहे.. आपण जो आवाज उठवला आहे, तो एका वृती विरोधात आहे.. योग्य गोष्टीच्या मागे मनसे नेहमीच उभी राहते आणि राहणार.. आम्ही मतांसाठी नाही तर अस्मितेसाठी लढतो, असं अविनाश जाधव म्हणाले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avinash Jadhav (@avinashjadhavmnsofficial)

प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेंड (Prasad Vedpathak Instagram Account Suspended)

पांढरी पट्टी हटवल्याच्या प्रसाद वेदपाठकच्या पोस्टवर आता काही जैन धर्मीय आक्रमक होत वादग्रस्त पोस्ट करत आहेत. तसेच, काही दिवसांपूर्वीच प्रसादनं काही जैन धर्मीय माझ्या अकाउंटवर मास रिपोर्टींग करत असल्याचा दावाही केलेला. याचाच परिणाम म्हणून प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड करण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. अकाउंट सस्पेन्ड करण्यात आल्याचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केलाय. यामध्ये प्रसादनं जे योग्य आहे ते बोलल्यानंतर हे तुम्हाला मिळतं असं म्हटलं आहे. 

नेमकं प्रकरण काय? (White Line Controversy In Mumbai)

सोशल मीडियावर गेल्या आठवडारापासून युट्यूबर प्रसाद वेदपाठकने (Prasad vedpathak) उचलून धरलेला वादाचा मुद्दा चांगलाच गाजत असून घाटकोपरमधल्या (Mumbai) सोसायटीचा हा वाद आहे. सोशल मीडियावर या वादावरुन वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. आपण राहत असलेल्या सोसायटीतील घटनेवर प्रसादनं संताप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केलीय, त्याच्या या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. कारण, सोसायटीमधील जैन कुटुंबीयांनी सोसायटीत कुणालाही न विचारता पांढरी पट्टी मारली होती. या पांढऱ्या पट्टीला सोयायटीमधील इतर सदस्यांनीही विरोध दर्शवला होता. माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. अखेर, आता ह्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करण्यात आलं असून स्वत: प्रसादने याची माहिती दिली आहे. 

प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली. त्यावर प्रसादने प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी सोसायटीतील सदस्यांची परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावा त्याने केला आहे. प्रसादच्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवला होता. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही त्याने केली होती. अखेर, प्रसादने ट्विटवरुन घटनेची माहिती देत, पांढऱ्या पट्ट्यांवर रंगकाम सुरू करण्यात आल्याचे सांगितले, त्याने फोटोही शेअर केला आहे. तसेच, माध्यमांनी दखल घेतल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Prasad Vedpathak White Line Controversy: इकडे भाजप नगरसेवकानं पोलिसांत तक्रार केली, तिकडे प्रसाद वेदपाठक मनसेच्या सर्वात डॅशिंग नेत्याला जाऊन भेटला, जैनांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता राजकीय आखाड्यात?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment On Student Protest: महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Nandurbar: आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; नंदुरबारच्या वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
Embed widget