एक्स्प्लोर

Pravin Darekar: फडणवीस-एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न; दरेकरांची SITची मागणी, चौकशीचे आदेश, विधीमंडळात पुन्हा 'पेन ड्राईव्ह' चर्चेत

Pravin Darekar: देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ओडीओ क्लिप सभागृहात सादर करण्यात आली आहे.

नागपूर: भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या ओडीओ क्लिपवरून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करून अडचणीत आणण्याचा डाव होता. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ओडीओ क्लिप सभागृहात सादर करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशीची मागणी केली त्याचबरोबर तत्कालीन डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांचे निलंबन करावे अशी मागणी केली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, एक स्टींग ऑपरेशन समोर आलं. तत्कालीन सरकारच्या आदेशानुसार तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचे षडयंत्र बाहेर आले.आज ते सरकारच्या निदर्शनास आणून दिले. जो जबाब यामध्ये समोर आला, तो फडणवीस व शिंदे यांना अडकवा. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना ती जबाबदारी दिली होती. संजय पुनामिया यांचा जबाब वाचून दाखवतो. सदर आरोपीने एसीपी सरदार पाटील यांना विचारणा केली. तुम्ही टार्गेट नव्हता. तर, शिंदे व फडणवीस हे टार्गेट होते. हे व्हिडिओ समोर आले आहेत. सूड भावनेने सरकारने वागू नये असं सांगताना महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे यांचे वर्चस्व वाढत होते म्हणून सूड बुद्धीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस सरकारचे भ्रष्टाचार मांडत होते. त्यांना गुंतवण्यासाठी सूडाच्या राजकारणाने पेटलेले सरकार त्यावेळी होते. मी चार मागण्या केल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी चौकशी करण्यात यावी, डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना निलंबित करून एसआयटी मार्फत चौकशी करा. सरकारी वकील म्हणून शेखर जगताप हे पॅनेलवर होते, त्यांना पॅनेलवरून काढावे संजय पाण्डेय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागण्या केल्या आहेत. सरकारी स्तरावरुन ही नावं येतात, डीजींना आदेश कोणी दिले, लक्ष्मीकांत पाटील डीसीपीला कोणी आदेश दिले,चौकशी झाली की समोर येईल, आम्ही त्यांचा चेहरा उघड केलाय, असंही दरेकरांनी पुढे म्हटलं आहे.

शंभूराजे देसाई यांनी विधान परिषदेत एसआयटीची केली घोषणा

 दरम्यान प्रवीण दरेकरांनी केलेली मागणी मान्य झाली आहे. पोलीस अधिकारी ओडिसी क्लिप प्रकरणात जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली एसआयटी चौकशी घोषणा करण्यात आली आहे. मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधान परिषदेत एसआयटीची घोषणा केली आहे. गरज भासल्यास माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची चौकशी केली जाणार असल्याचे शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ओडीओ क्लिप सादर करत चौकशीसाठी एसआयटी चौकशीची मागणी दरेकरांनी केली होती. तत्कालीन डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांचे निलंबन करावे अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget