नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर देशातील विविध राज्यातील 13 विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक (Assembly By Election) पार पडली होती. या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये चार, हिमाचल प्रदेशमधील 3, बिहार1, उत्तराखंड 1, तामिळनाडू 1, पंजाब 1,  मध्य प्रदेशमधील एका जागेवर मतमोजणी सुरु आहे. प्राथमिक कलांनुसार पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस (TMC), हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस (Congress) आघाडीवर आहे. तर, मध्य प्रदेशात काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या बालेकिल्ल्यात भाजप आघाडीवर आहे. 


लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगामध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या तृणमूल काँग्रेसनं विधानसभा पोटनिवडणुकीत देखील चांगली कामगिरी केली आहे. रायगंज, राणाघाट दक्षिण, बागदा आणि मानिकतला जागेवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. रायगंज मधून टीएमसीचे कृष्णा कल्याणी, राणघाट दक्षिण मधून मुकुट मणी अधिकारी बागदा मधून मधूपर्णा ठाकूर, माणिकताला मधून सुप्ती पांडे आघाडीवर आहेत.  


उत्तराखंडच्या बद्रीनाथ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे लखपत बुटोला आघाडीवर आहेत. तर, मगलौर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे काझी मोहम्मद निजामुद्दीन आघाडीवर आहेत.  


बिहारच्या रुपौली विधानसभा मतदारसंघात जदयूचे कालाधर प्रसाद मंडल आघाडीवर आहेत.राजदच्या बीमा भारती या ठिकाणी पिछाडीवर आहेत.   



हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर, नालागढ आणि देहरा या तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. देहरामधून मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर आघाडीवर आहेत हमीरपूरमध्ये पुष्पिंदर वर्मा आणि नालागढमध्ये हरदीप सिंग बावा आघाडीवर आहेत.  


मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या बालेकिल्ल्यातील अमरवाडा विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. भाजपचे कमलेश प्रताप शाह आघाडीवर आहेत.  


पंजाबमधील जालंधर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे उमेदवार मोहिंदर भगत आघाडीवर आहेत. इथं काँग्रेस उमेदवार सुरिंदर कौर पिछाडीवर आहेत.  



तामिळनाडूत  द्रमुकचे अनियूर सिवा विक्रावंडी मतदारसंघातून आघाडीवर आहेत.


कोणत्या मतदारसंघात पोटनिवडणूक


पश्चिम बंगाल: 4 जागा,  
मतदारसंघ : रायगंज, राणाघाट दक्षिण, बागदा आणि मानिकतला 
हिमाचल प्रदेश: 3 जागा 
मतदारसंघ : देहरा, हमीरपूर,नालागढ 
उत्तराखंड: 2 जागा 
मतदारसंघ : मंगलौर आणि बद्रीनाथ  
बिहार: 1 जागा 
मतदारसंघ : रुपौली  
तामिळनाडू: 1 जागा 
मतदारसंघ:  विक्रावंडी  
पंजाब: 1 जागा  
मतदारसंघ : जालंधर पश्चिम 
मध्य प्रदेश:  1 जागा
मतदारसंघ : अरमवाडा 


इतर बातम्या : 



मोठी बातमी: नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, मतदारांना धमकावून मिळवला विजय; ठाकरे गटाच्या नेत्याकडून याचिका दाखल