Jayant Patil on Vidhan Parishad Election, मुंबई : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. महायुतीने विधानपरिषद निवडणुकीत बाजी मारली आहे, तर महायुतीला एका जागेवर फटका बसलाय. कारण काँग्रेसची 8 मतं फुटली आहेत. काँग्रेसची मतं फुटली नसती तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील पुन्हा एकदा निवडून आले असते, असं बोललं जात आहे. या निवडणुकीत महायुतीचे 9  पैकी 9 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार जिंकले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. दरम्यान, निवडणुकीत फटका बसल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. 


काँग्रेस प्रमुख पक्ष होता, त्यांची 37 मतं होती


जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीची काही मतं फुटलेली दिसत आहेत. काँग्रेस प्रमुख पक्ष होता, त्यांची 37 मतं होती. आम्ही कोटा वाटून दिलेला होता. आम्हाला अपेक्षा होती की, तिसरा उमेदवार निवडून येईल, पण तसं काही झालेलं दिसत नाही. राष्ट्रवादीची बारा मतं होती. ती बाराही मतं आमच्या उमेदवाराला पडली. आम्ही जयंत पाटलांना ही मतं देणार होतो. ती आम्ही त्यांना दिली. उबाठाचं मला नक्की माहिती नाही. काँग्रेसची मतं फुटली आहेत. काँग्रेस पक्ष याचा गांभिर्याने विचार करेल. त्यांच्या प्रमुखांशी चर्चा झाली, तेव्हा माझ्या लक्षात आलं, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. 


विधानपरिषदेची निवडणूक वेगळी आणि विधानसभेची निवडणूक वेगळी असते


जयंत पाटलांना आम्ही आमचं समर्थन दिलं होतं. आमची 12 मतं त्यांना मिळाली. बाकीची मतं मिळणं आवश्यक होतं, ती मिळू शकली नाहीत. काल आम्ही याबाबत स्टॅटेजी ठरवण्यासाठी आम्ही बराच वेळ बसलो होतो. विधानपरिषदेची निवडणूक वेगळी आणि विधानसभेची निवडणूक वेगळी असते. आज 273 मतं होती, त्याच्यातला हा खेळ होता. व्यक्तिगत मतदान होतं आणि ते गुप्त असतं. त्यावेळी काय होतं ते मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. काही लोकांकडे पैसे खर्च करण्याची मोठी क्षमता,अशा इले्क्शनमध्ये फायदा होतो, जनतेच्या निवडणुकीत नाही. हे लोकसभेच्या निवडणुकीने दाखवून दिलंय, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं. 


Prithviraj Chavan on Vidhan Parishad Election : काँग्रेसची मतं फुटली, पृथ्वीराज चव्हाण संतापले, म्हणाले; 'मविआला मतं दिली नाही अशा आमदारांची नावे'