Ashok Chavan on Supriya Sule : "आम्ही सहा सहा महिने काम करुन खासदार होतो. तेही 5 वर्षांसाठी खासदार होतो. अशोक चव्हाण काहीही न करता 6 वर्षांसाठी खासदार झाले", अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. बारामती येथील सभेत सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला होता. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते. 


काय म्हणाले अशोक चव्हाण? 


अशोक चव्हाण समजून घ्यायला सुप्रिया सुळेंना फार वेळ लागणार, त्यांनी बारामती पाहावी. नांदेडकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी सुप्रिया सुळे यांना दिले आहे. अशोक चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले, आम्ही आज देगलूरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. शिवाय, देगलूरमध्ये जे लोक माझ्या सोबत येण्यास इच्छुक होते, त्यांच पक्षप्रवेश पार पडला. भाजपमधील कार्यकर्ते आणि माझ्यासोबत काँग्रेसमध्ये आलेले पदाधिकारी यांच्या मनोमिलनाचा हा कार्यक्रम होता. सर्व लोक जोमाने कामाला लागली आहेत. प्रतापराव चिखलीकर यांच्या विजयसाठी कोणतेही मतभेद न ठेवता एकत्र येऊन सर्व तयारी सुरु झालेली आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपा जिंकणार आहे. सन्माननीय मोदी साहेबांनी जी जबाबदारी आमच्यावर टाकली आहे. ती जबाबदारी आणि जिम्मेदारीने पार पाडू. वेळ कमी असताना देखील आज लोकांची इथे मोठी गर्दी होती. त्यांना एकत्र आणणे आणि विश्वास देणे आमच्यासाठी महत्वाचं आहे. 


भाजपने अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे


सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, मी अशोक चव्हाणांवर बोलून थकले. मात्र एकाही भाजप नेत्याने माझ्या प्रश्नांची उत्तर दिली नाहीत. आम्ही सहा-सहा तास काम करुन खासदार होतो. पण अशोक चव्हाण काहीही न करता खासदार झाले आहेत. भाजपने अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. मात्र, आज ते भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पवित्र झाले आहेत. अशोक चव्हाण यांनी भ्रष्टाचार केला नसेल तर, भाजपने अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. आम्ही खोटे आरोप केले असेही त्यांनी सांगितले पाहिजे, असेही सुळे यांनी स्पष्ट केलं.  अतिशी यांना आंदोलन करीत होत्या म्हणून अटक केली. काही लोकांना फोन येतात घाबरायचं नाही. जे तिकडे आहेत त्यांचा प्रचार करीत आहेत त्यासंदर्भात आम्ही काही तरी बोलतो का?दडपशाही आम्ही बारामतीत चालू देणार नाही, असा इशाराही सुळे यांनी यावेळी बोलताना दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर, गडकरींविरोधात विकास ठाकरे, भंडारा-गोंदियातून प्रशांत पडोळे रिंगणात