Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजप विरोधात जाऊन पुन्हा एकदा सोबत येऊ शकतात तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतही पुन्हा एकदा युती होऊ शकते का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीला स्पष्टपणे नकार दिलाय. गेट वे ऑफ इंडिया येथे लोकमतचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. 


उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 


देवेंद्र फडणवीस म्हणाले,"उद्धव ठाकरे आमच्यासोबत येण्याची कोणतीही शक्यता नाही. उद्धव ठाकरेंनी आमच्यासाठी त्यांची दारे बंद केली. राजकारणात तुमचा आणि माझा पॉलिटिकल अजेंडा असतो. पॉलिटिकल अजेंडा वेगवेगळा असू शकतो. मात्र, उद्धव ठाकरेंनी आमची मने दुखावली आहेत. ज्या प्रकारे त्यांचा व्यवहार राहिला आहे. ज्या प्रकारे ते पीएम मोदींवर टीका करतात. ते खालच्या स्तरावर जाऊन ते बोलतात. या सर्व गोष्टींमुळे मने दुखावली गेली आहेत आणि जिथे मने दुखावतात तिथे आघाडी होऊ शकत नाही. वेगवेगळ्या विचारांची माणसे एकत्रित येऊ शकतात. मात्र, मने दुखावल्यानंतर एकत्र येणे कठीण असते. आमची मने दुरावलेली आहेत. यामध्ये काही शंका नाही."


राहुल गांधीबद्दलही फडणवीसांकडून भाष्य 


काँग्रेसमधून नेते आमच्याकडे येतात. याचे श्रेय जेवढे मोदीजींना द्यावे लागेल. तेवढेच राहुल गांधी यांनाही द्यावे लागले. उद्धव ठाकरेंची तर वेगळीच परिस्थिती आहे. ते वेगवेगळ्या भागात जातात आणि आमच्याविरोधात शिमगा करतात. ज्याप्रकारे विरोधी लोक पक्ष चालवतात. त्यामुळेच नेते आमच्या पक्षात प्रवेश करतात. बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 


पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या पक्षातील लोक आमच्यासोबत येऊन जय श्रीराम आणि वंदे मातरमचा नारा देत असतील तर भाजपच्या मतदारांना हे नक्कीच आवडेल. माझा अजेंडा पॉलिटिक्स नाही. माझा अजेंडा विकास आहे. माझ कोणतेही भाषण ऐका 90 टक्के विकास असतो आणि आता 10 टक्के राजकारण असते. संभाजीनगर आणि कोकणात जे लोक दौरा करत आहेत, त्यांनी विकासाबाबत चकार शब्द काढलेला नाही. 


पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील विकासाच्या भूमिकेत ते माझ्यसोबत होते. त्यांना माहिती माझी कामे राज्याचे विकासासाठीच असतात. माझ्या आणि एकनाथ शिंदेंमध्ये चांगली अंडरस्टॅडींग आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. संख्याबळाच्या जोरावर मुख्यमंत्री ठरणार नाही. मात्र, यामध्ये महत्वाचा रोल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल. शेवटी कार्यकर्त्यांचे मोटीवेशन असते की, आपला नेता मोठा व्हावा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


उद्धव ठाकरेंनी आमची मनं दुखावली, आता त्यांच्यासोबत कधीच युती नाही : देवेंद्र फडणवीस