Ashish Shelar on Raj Thackeray: आशिष शेलारांनी राज ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळले; म्हणाले, 'तुमच्या घरातल्या व्यक्तीला...'
Ashish Shelar on Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीवरून आशिष शेलारांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Ashish Shelar on Raj Thackeray and Uddhav Thackeray: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची संयुक्त मुलाखत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि सिनेअभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी घेतली. या मुलाखतीवरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. चित्रपट बघायचे आणि फापडा जिलेबी खायची, असा टोला देखील आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. ठाकरेंना मुंबईकरांशी देणेघेणे नाही. महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, अशी टीका देखील आशिष शेलार यांनी केली आहे.
Ashish Shelar on Raj Thackeray and Uddhav Thackeray: मुंबईकरांसाठी ते कधी रस्त्यावर आले आहेत का?
आशिष शेलार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, हे सगळे फिल्मी लोक आहेत. दिवसा, संध्याकाळी, रात्री सिनेमा बघायचा. घर-परिवारासोबत फाफडा जिलेबी खायची. मित्रांबरोबर गप्पा मारायच्या, त्यांना मुंबईकरांशी काही घेणंदेणं आहे का? त्यांचा मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे? मुंबईकरांसाठी ते कधी रस्त्यावर आले आहेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले तेव्हा कुणी बंगल्यावर तर कुणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते. हे दोन भाऊ पुराच्या वेळी मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
Ashish Shelar on Raj Thackeray: अमित ठाकरेंच्या पराभवावरून राज ठाकरेंना टोला
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला होता. शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी अमित ठाकरे यांचा परभव केला होता. यावरून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. तुमच्या घरातल्या व्यक्तीला तुम्ही जिंकवू शकले नाहीत. त्यांना लोकांनी घरी बसवले, ज्यांनी घरी बसवलं, त्या उभाठा सेनेसोबत तुम्ही हात मिळवणी केली. त्यामुळे मतदारांनी ज्यांना बसवले, सत्तेमध्ये सेवा करण्याची संधी दिली, त्यांच्यावर तुम्ही टीका करत आहात. पहिले तुमच्या घरातल्या लोकांना कोणी घरी बसवले ते आधी बघा, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Before You Go
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान





















