मुंबई: राष्ट्रवादीने आम्हाला 2016-17 मध्ये  प्रस्ताव पाठवला होता, पण त्यांना शिवसेना सोबत नको होती, आम्ही तो मान्य केला नाही ही आमची चूक झाली, त्यावेळी जर राष्ट्रवादीशी युती केली असती तर आज ही परिस्थिती नसती असं वक्तव्य मुबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shela) यांनी केलं. उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) विश्वास ठेवणे ही आमची सर्वात मोठी चूक होती, त्यांनी आमचा विश्वासघात केला असा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांना संपर्क करतायत का याबद्दल मी भाष्य करणार नाही. पण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आमच्या विरुद्ध उभे आहेत, त्याला पाहता त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे बंद केलं आहेत असंही आशिष शेलार यांनी सांगितलं.


उद्धव ठाकरेंना 'सिल्व्हर ओक'ने संपवले


उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली, शिंदेंनी नाही. उद्धव ठाकरे यांनी गद्दारी आमच्याशी केली म्हणून शिंदे आमच्या सोबत आले. आदित्य ठाकरेंच्या अहंकारापोटी आमची युती तुटली. आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टामुळे शिवसेनेने 2019 ला 151 चा नारा दिला. ते आम्हाला न विचारता केला, ती गद्दारी नव्हती का? त्यामुळे ठाकरे आणि पवारांनी माफी नाही. 


राज ठाकरे महायुतीचा प्रचार करतील 


एका ठाकरेला लांब केलं आणि दुसऱ्याला जवळ करणं हे दोघांमध्ये वैचारिक फरक आहे. राज ठाकरेंनी देशहितासाठी आम्हाला पाठिंबा दिला तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी आमच्याशी गद्दारी केली. राज ठाकरेंना जागा मिळतील का नाही हे लवकरच कळेल. राज ठाकरे महायुतीसाठी निश्चित प्रचार करतील अशी माझी अपेक्षा आहे. 


ज्या ठिकाणी जो बळकट त्याला उमेदवारी


उत्तर मुंबईमध्ये मध्ये पूनम महाजन यांनाच उमेदवारी द्यावी असं आम्ही सगळ्यांनी पक्षश्रेष्ठींना सुचवलं आहे, मला वाटतं त्यांनाच उमेदवारी दिली जाईल असंही आशिष शेलार म्हणाले. ते म्हणाले की, ठाणे, नाशिक, मुंबई या सगळ्या जागांचा निर्णय लवकरच होईल. कोणती जागा कोणाची यापेक्षा कोण कोणत्या जागेवर निवडूण येऊ शकते हे पाहताच उमेदवारी दिली जाईल. जिथे भाजप जिंकू शकतो तिथे भाजप, जिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकू शकतो तिथे शिवसेना, जिथे राष्ट्रवादी मजबूत आहेत तिथे राष्ट्रवादीचा उमेदावर दिला जाईल.  


उशिरा उमेदवारी देणे हा स्ट्रॅटेजीचा भाग


उमेदवार बदलणे, उमेदवांराच्या नावाची घेषणा न करता एबी फॉर्म देणे, उशीरा उमेदावर देणे हा सगळा आमच्या स्ट्रेटरजीचा भाग आहे, आमच्या कोणतेच मतभेद नाही हे तुम्हाला लवकरच कळेल असे आशिष शेलार म्हणाले. ते म्हणाले की, ईडी, सीबीआयवर केंद्र सरकार भाजपचा कोणताच दबाव नाही, ज्यांनी चोरी केली त्यांना जेलमध्ये जावं लागेल.ज्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले असे कोणतेही नेते आमच्या सोबत नाहीत, जे सोबत आहेत त्यांच्यावर जर आरोप सिद्ध झाले तर निश्चित कारवाई करु.


ही बातमी वाचा: