Ashish Shelar Meets Salman Khan: राज्यातील सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024)  अनुषंगाने कामाला लागले आहे.  भाजपने (BJP)  जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. यासोबत डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती देखील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी अभिनेता सलमान खानची (Ashish Shelar Meets Salman Khan)  भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याने चर्चा रंगल्या आहे. आशिष शेलार यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 


उत्तर मध्य मुंबई (North Central Mumbai Constituency)  या लोकसभा मतदार संघासाठी पुनम महाजन (Poonam Mahajan)  यांच्या जागी आशिष शेलार यांना उमेदवारी देण्यात येणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण सलमान खान देखील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात राहतो.   आशिष शेलार यांनी काल दुपारी भेट घेतली यावेळी सलीम खान देखील उपस्थित होते. यावेळी लंच डिप्लोमसी झाल्याचे पाहायला मिळते. स्वत: आशिष शेलार यांनी हे ट्वीट केले आहे.  त्यामुळे आशिष शेलार खरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


 






आशिष शेलार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?


आशिष शेलार गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी घेत आहे. मतदारसंघात फिरत आहे. त्यामुळे पुनम महाजन यांच्या जागी खरच आशिष शेलार यांना उमेदवारी देणार का हे देखील पाहणे तितकेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सलमान खान आणि आशिष शेलार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. या लंच डिप्लोमसी वेळी सलमान खान, वडिल सलीम खान, आई हेलन उपस्थित होते.


भाजपने या जागेवरून सलग दोन निवडणुका जिंकल्या


2014 च्या मोदी लाटेपासून भाजपने या जागेवरून सलग दोन निवडणुका जिंकल्या आहेत. त्यापूर्वी ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. मुस्लिम आणि उत्तर भारतीय बहुल या जागेवर काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांचे लक्ष आहे. सध्या भाजपच्या नेत्या पूनम महाजन येथून खासदार आहेत.  



हे ही वाचा :


Amol Kirtikar : ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात, अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी समन्स