Ashish Shelar : मुंबईमध्ये भाजप (BJP) कार्यकर्ता सत्कार सोहळा पार पाडलाय. या सत्कार सोहळ्यात भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. टोल, रस्ते, खड्डे आणि पुनर्विकासावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला चढवला आहे. यावेळी शेलार यांनी म्हटलं आहे की, आम्ही जिथे उभे राहतो तिथून रांग सुरु होते.


यावेळी शेलार यांनी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. त्यांनी निशाणा साधत म्हटलं की, 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लालबागचा राजा विराजमान नाही, यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात होणार आहे. मी तिसऱ्यांदा मुंबई भाजप अध्यक्ष झालो, पक्षाने एका विचाराला अध्यक्ष बनवलंय. एका समस्येला, एका जागृतीला अध्यक्ष बनवलं आहे. गिरणी कामगारांना घर मिळालंच पाहिजे. टोल नाक्यावर संघर्ष करणारे लोढा पाहिजेत.'


भाजप कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी 


मुंबईत पार पडलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशीष शेलार यांच्यासह प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन भाजप नेते कामाला लागले आहेत. आशीष शेलार यांची तिसऱ्यांदा भाजप अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांचा शिवसेनेवर घणाघात सुरुच आहे.


'पालिका निवडणुकीत मुंबईवर भाजपाचं कमळ फुलणार'


येणाऱ्या पालिका निवडणुकीत वरळीच नव्हे तर पूर्ण मुंबईवर भाजपाचे कमळ फुलणार आहे. शिवसेना पक्ष हिंदू सणांना विसरला आहे. मराठी माणसांचे सण त्यांनी मागे टाकले आहेत. त्यामुळे वरळी जांभोरी मैदानात त्यांनी साधी परवानगी देखील घेतली नाही. वरळीतच नाहीं तर संपूर्ण मुंबईत भाजपच सत्ता मिळवणार आहे. आमच्याच पाठिंब्यावर वरळीत तुम्ही निवडून आलात विसरू नका, असा टोला आशिष शेलार यांनी आधीही लगावला होता. ते मुंबईतील दहीहंडी उत्सवामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या