Bmc Election 2022: चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपलं पूर्ण लक्ष हे मुंबईवर केंद्रित केलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन भाजप नेते कामाला लागले आहेत. आज बावनकुळे यांनी नवनिर्वाचित भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यसह मुंबईतील विविध भागांना भेट दिली. दादरमधील वीर सावरकर स्मारकालाही त्यांनी भेट दिली. यावेळी सचिन शिंदे आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. 


यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले आहेत की, मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्हाला जबाबदारी देण्यात आली आहे. जिथे पक्ष पोहोचला नाही तिथे पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येक बूथवर 30 कार्यकर्ते तयार करणार. मोदींसाठी काम करणारी युवासेना तयार करण्याचा मानस असल्याचं ते म्हणाले आहेत. तर आशिष शेलार म्हणाले की, ''मुंबईवरील एका कुटुंबाची मक्तेदारी संपली पाहिजे. आमचे 200 + नगरसेवक निवडून येतील आणि आमचे 45+ खासदार निवडून येतील.''


तत्पूर्वी बावनकुळे यांच्याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''राज्यात नवीन सरकार आल्यानंतर जबाबदारीमध्ये बदल केला आहे. आमच्या दोन युवा सहकार्यांना जबाबदारी देण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. महामंत्री म्हणून त्यांनी ज्या प्रकारे प्रवास केला मला विश्वास आहे की, वेगाने काम करणारे अध्यक्ष आपल्याला मिळाले. भाजपचे काम सर्वव्यापी पोहोचवण्यासाठी ते निश्चितपणे काम करतील.'' तसेच आशिष शेलार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, आशिष शेलार हे मुंबई अध्यक्ष याआधी देखील राहिले त्यांच्या काळात पालिकेने गरुड भरारी घेतली. 2017 च्या पालिका निवणुकीत आम्ही 82 जागा  जिकलो. त्यावेळी महापौर आम्ही बसवला असता, पण आता ती कमतरता भरून काढण्यासाठी आता आशिष शेलार यांना आम्ही पाठवले आहे. आमचा मित्रपक्ष असलेली शिवसेनेला सोबत घेऊन आम्ही युतीचा झेंडा लावू. जे आम्ही करू शकलो नाही त्यापेक्षा जास्त काम हे दोन्ही अध्यक्ष करतील.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Road Accident In Maharashtra : सहा महिन्यात रस्ते अपघातात 8068 बळी, नाशिकमध्ये सर्वाधिक मृत्यू, मुंबई-पुण्यात किती दगावले?
Vinayak Mete: विनायक मेटेंचा पाठलाग करणारी कार आणि कार मालक रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरु
Nashik iskcon Temple : नाशिकच्या इस्कॉन मंदिरात आगळावेगळा जन्माष्टमी सोहळा, विविध कार्यक्रमांची रेलचेल!