Asaduddin Owaisi on Manoj Jarange, Chhatrapati Sambhajinagar : "जर लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत म्हणून कोणी म्हणायला तयार असेल तर त्याला आम्ही बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहोत. मोदी खोटं बोलू नका ,नाही तर कावळा चावेल. मी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना सलाम करतो, ज्यांनी मोदीला परेशान करून आवडलं. मुख्यमंत्री शिंदे यांना तर झोप येत नाही", असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) म्हणाले. औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ असदुद्दीन औवेसी सभा घेतली यावेळी ते बोलत होते. 


कालपर्यंत खैरे खान की बाण करायचा


असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) म्हणाले, खैरला 30 वर्षांनी ईदगाह दिसले. कालपर्यंत खैरे खान की बाण करायचा. पण आता मशीद जवळ आला आहे. खैरे आता काय करणार माहीत नाही. उद्या देशात एनआरसी येणार आहे. उद्या एनआरसी चा आदेश कोण फाडणार ,खैरे फाडणार की जलील फाडणार? एनआरसीला उद्या  उद्धव ठाकरे विरोध करणार का? असे सवालही असदुद्दीन औवेसी यांनी केले. 


खैरे याने अनेकांना बेरोजगार करून ठेवलं


पुढे बोलताना असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) म्हणाले, जलील पाच वर्षे खासदार राहिले. पाण्याचा प्रश्न खैरे मिटवू शकले नाहीत. जलील यांनी 200 कोटींचे रुग्णालय सुरू केले. खैरे याने अनेकांना बेरोजगार करून ठेवलं. जलील यांनी अनेक विमान सुरू केले. खैरे चमचे म्हणतात वरती पाहा, पण कुठेही पाहा पतंग दिसत आहे. आता मुलं म्हणतात उद्धव ठाकरेंना सांगा पंतगला मतदान करा.


मोदी आपल्या वडिलांनी 6 जणांना जन्म दिला


आम्ही घुसखोर असल्याचं पंतप्रधान म्हणत आहेत. मोदी आपल्या वडिलांनी 6 जणांना जन्म दिला. शहा यांच्या वडिलांनी 6 मुलींना जन्म दिला. ही आमच्या बापाची जमीन आहे. नुपूर शर्मा कुणाच्या पक्षाची आहे. तुम्ही 10 वर्षात हिंदू-मुस्लिम केलंय. तुम्ही एक मुस्लिम उमेदवार दिला नाही. भारत आमचा होता आणि राहील. मला सांगितले की, भुमरे यांची 27 दारूची दुकाने आहेत, असंही ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Unmesh Patil on Girish Mahajan : गिरीश महाजनांना दोन नंबरच्या पैशाची मस्ती, संकटमोचक नाही, तर संकट आहे; उन्मेष पाटलांची टीका