मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024 Results) भाजपच्या (BJP) नेतृत्वात एनडीएला (NDA) पुरत अपयश आलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Politics) महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) बाजी मारली. भाजपच्या अपयशाचा जबाबदारी आपल्यावर घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी खोचक प्रतिक्रिया देत, लोकं तुमच्या संन्यासाची वाट पाहताहेत, असं म्हटलं आहे.
लोकं तुमच्या संन्यासाची वाट पाहताहेत
अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका करताना म्हटलं आहे की, राजकीय व्यभिचाराची ही परिणिती आहे. कपट फार काळ चालत नाही. 45 प्लस म्हणत होते. लोकं तुमच्या संन्यासाची वाट पाहताहेत. वैचारिक, सामाजिक आणि आर्थिक व्यभिचार केला, त्याचं प्रतिक म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांच्यावरही दोन व्यभिचारी आहेत. आमच्यांकडून जे गेले आणि त्यांना जे भेटले ते पण व्यभिचारी, असंही अरविंद सावंत म्हणाले.
फडणवीसांवर अरविंद सावंताची खोचक प्रतिक्रिया
अरविंद सावंत म्हणाले की, संजय राऊत यांच्या नेतृत्वात आम्ही बैठकीला जाऊ. सत्तेसाठी पळणारी आमची औलाद नाही. सत्ता स्थापनेसाठी काय करणार का, हे वरिष्ठ ठरवतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.
आता कुदळ मारली, अजून खड्डा बाकी है
रावणाचा अहंकार पण असाच बुडाला होता. 400 पार म्हणणाऱ्यांना तडीपार केलं. आता कुदळ मारली, अजून खड्डा बाकी है. अमोल किर्तीकर प्रकरणात हेराफेरी झाली आहे. तिथे पोस्टल मतांत हेराफेरी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी दाखवून दिलं.