मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजप आणि महायुतीला मिळालेल्या कमी जागांची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली आहे. भाजपच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, यापुढे आता पक्ष संघटनेच्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला उपमुख्यमंत्रिपदावरून मुक्त करावं (Devendra Fadanvis Ready To Resignation) अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाला केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर आता भाजपसह महायुतीमध्येही खळबळ उडाल्याचं दिसतंय.
लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाला सुरूवात झाल्याचं दिसतंय. त्याची सुरूवात भाजपमधून झाली आहे. महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर काही ठिकाणी समन्वय नसल्याचा फटका आपल्याला बसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तसेच विरोधकांनी संविधान बदलण्याचं खोटं नॅरेटिव्ह तयार केलं आणि त्याचा फटका महायुतीला बसल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारमधून मोकळं करण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे केली आहे. पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पक्षासाठी काम करण्यासाठी सरकारमधून मोकळं होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त दाखवली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे."
महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला. हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही. त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा आम्हाला फटका बसला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काल लोकसभा निवडणुकांचे निकाल आले. मी देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आभार मानतो. पंडित नेहरूंच्या नंतर पुन्हा एकदा जनतेने तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मोदींना आशीर्वाद दिला. पहिल्यांदा ओरिसामध्ये पहिल्यांदा भाजप नेतृत्वात सरकार बनणार आहे. भाजप आणि एनडीए घटक पक्ष मिळून सरकार बनणार.
राज्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. आम्हाला खूप कमी जागा मिळालेल्या आहेत. महाविकास आघाडिला राज्यात 2 लाख मते आमच्या पेक्षा जास्त मिळाली. मुंबईत दोन लाख मतं आम्हाला जास्त मिळालेली आहेत. काही जागा आम्ही 2000 हजार पेक्षा कमी मतानी हरलो. ही निवडणूक घासून झाली. पण भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही. सम समान मते मिळाली आहेत.
आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे. याबाबत आम्ही दिवसभर बैठक घेऊ. निवडणुकीत कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केला. काही ठिकाणी अँटिइंकबन्सी दिसली.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेले आहे. मुंबईच्या अध्यक्षाने स्वतः लक्ष घातले. मी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन करतो. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचा आहे. मला सरकारमधून मोकळ करावे अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी पक्षासाठी काम करेन.
काही ठिकाणी कांदा आणि सोयाबिनचा प्रश्न होता, कापसाचाही प्रश्न होत. त्यामुळे काही ठिकाणी सरकारविरोधात अँटिइन्कम्बन्सी होती.
जनतेने दिलेले जनादेश माणून आम्ही पुढील तयारी कऱण्याचा निर्णय घेतला. ज्यांना जास्त जागा मिळाल्या. त्यांचं अभिनंदन करतो.
ही बातमी वाचा :